शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगररचनाकार कार्यालयात कामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:32 IST

शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या येथील नगर रचना विभागात कर्मचाऱ्यांची अर्धी पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत आहे.

ठळक मुद्देकामे दुर्लक्षित : कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त

देवानंद नंदेश्वर ।आॅनलाईन लोकमतभंडारा : शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या येथील नगर रचना विभागात कर्मचाऱ्यांची अर्धी पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सर्वसामान्य नागरिक याच कार्यालयात धाव घेत असून अपुºया कर्मचाºयांमुळे कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढला आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरणात वाढ होत आहे. शहरीकरणामध्ये नगर विकास विभाग महत्वाचा मानला जातो. शहरी भागातील वाहतूक, घरांची समस्या, घनकचरा व्यवस्थापन या नागरी भागाच्या विकासाशी निगडीत असलेल्या नगर विकास विभागाला अनन्यसाधारण महत्व आहे.भंडारा नगर रचना विभागात एकूण १३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या पदांमध्ये सहाय्यक नगर रचनाकार १, वरिष्ठ लिपीक १, अनुरेखक २, दफ्तरबंद १, शिपाई १ या पदांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात प्रादेशिक विकास योजना लागू होत असून या विभागातील कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संपूर्ण जिल्ह्याचा भार या कार्यालयावर आला असून कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत.सदर प्रतिनिधीने सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास नगर रचनाकार कार्यालयात फेरफटका मारला असता या कार्यालयात केवळ दोन कर्मचारी उपस्थित दिसले.या कार्यालयाची धुरा सांभाळणारे नगर रचनाकार अधिकारी संजय खापर्डे हे कक्षात उपस्थित नव्हते. तर सहायक नगर रचनाकार भाग्यश्री बोरकर या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेले असल्याचे सांगण्यात आले. येथील बहुतांश खुर्च्या कर्मचारी अभावी रिकाम्या दिसून असल्याचे आढळून आले.कार्यालयाला शासकीय वाहन नाहीनगर विकास विभागाचे मंत्री खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शहराच्या विकासावर त्यांचा अधिक भर आहे. कालच रविवारला त्यांनी भंडारा व तुमसर शहरासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा केली. परंतु, शहर विकासात मोलाची भूमिका बजावणारा भंडारा येथील नगर विकास विभाग समस्यांच्या गर्तेत आहे. विशेष म्हणजे, या विभागाचे प्रमुख असलेल्या नगर रचनाकारांना शासकीय वाहन नाही. त्यामुळे त्यांना खासगी वाहनाने दौरे करावे लागतात.नगर रचना विभागातील रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही महिन्यात ही पदे भरली जाण्याची शक्यता आहे. नागरिकांची कामे लवकर करण्यावर आपला भर आहे.- भाग्यश्री बोरकर,सहाय्यक नगर रचनाकार, भंडारा.