शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

काम खासगीतील; वेतन वनविभागाच्या तिजोरीतून

By admin | Updated: September 10, 2016 00:38 IST

भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्या अनेक अनियमित प्रकरणांची वृत्तमालिका ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत आहे.

वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांचा प्रताप : वर्षभरापासून महिला व्हॉऊचर वेतनावरप्रशांत देसाई भंडाराभंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्या अनेक अनियमित प्रकरणांची वृत्तमालिका ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत आहे. त्यात आणखी एक भर पडली असून त्यांच्या शासकीय क्वॉर्टरवर एक महिला मजूर कामाला आहे. ही महिला साहेबांनी स्वत:च्या कामासाठी ठेवली असतानाही तिला वेतन मात्र, शासकीय तिजोरीतून देण्यात आल्याने शासनाला हजारोंचा चूना लावण्यात आलेला आहे.भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाचे संंजय मेश्राम हे १ सप्टेबर २०१५ ला भंडारा येथे रूजू झाले. त्यांना येथे आता वर्षभराचा कालावधी झालेला आहे. या वर्षभरात त्यांनी वनविभागाच्या संपत्तीवर अनेक बाळेबोरे केल्याचा व तेवढाच रंजक प्रकार नित्याने बाहेर येत आहे. सुरूवातीला त्यांचा कोका विश्रामगृहाचे लाकडी साहित्य अफरातफर प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच, मेश्राम यांनी साहित्याची अफरातफर केली नसून अनेक साहित्य कोकाला परत पाठविल्याचा बनाम करण्यात आला. मात्र, तिथे दोन दरवाजे व ३५ सिमेंट पत्रे वळगळता कुठलेही साहित्य परत पाठविले नसल्याची गंभीर बाब समोर आली. त्यातही या सर्व साहित्यांचा लिलाव करण्याचे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांचे आहे. परंतु लाकूड साहित्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार त्यांच्याकडून करण्यात येत आहे.‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रकरण अंगलट येईल, या भितीने मेश्रांम यांनी सर्व साहित्य त्यांच्या क्वॉर्टरमध्ये परत बोलावून ते दडवून ठेवलेले आहे. शासकीय साहित्य स्वत:च्या क्वॉर्टरमध्ये ठेवण्याचा असा कुठलाही अधिकार त्यांना नसतानाही त्यांनी असा प्रकार केलेला आहे. यावरूनच हा सुस्थितीतील साहित्यांचीही त्यांना विल्हेवाट लावायची असल्याचे दिसून येते. यासोबतच उपविभाग व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या परिसरातील वृक्षांची कटाई करण्यात आली. या वृक्षकटाईला पालिका प्रशासनाने परवानगी दिलेली नसतानाही कटाई केल्याचे गंभीर प्रकार मेश्राम यांनी केलेला आहे. यासोबतच मेश्राम यांचे अनेक रंजक प्रकरण आता समोर येऊ लागली आहे.मेश्राम यांचे कुटुंब नागपूरला राहत असल्याने ते एकटेच त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहतात. त्यामुळे त्यांनी वर्षभरापासून एक महिला मजूर त्यांच्या येथील कामासाठी ठेवलेली आहे. त्यांनी स्वत:च्या कामासाठी ठेवलेल्या या महिलेचे वेतन ते शासकीय तिजोरीतून देत आहे. या महिलेला त्यांनी दैनंदिनी मजूर म्हणून ठेवले असून तिला २९६ रूपये ४८ पैसे अशी मजूरी दिल्या जात आहे. विशेष म्हणजे तिच्या महिन्याचे वेतन व्हॉऊचरवर होत असल्याने तो शासकीय तिजोरीतून देण्यात येत आहे. कामे करायची साहेबांच्या घरची व वेतन द्यायचे शासकीय तिजोरीतून. असा प्रकार मागील वर्षभरापासून सुरू आहे. प्रकरण अंगलट येईल या भितीने सदर महिला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व उपवनसंरक्षकांच्या बंगल्यावरील नर्सरीत कार्यरत असल्याचे दाखवून तिचे व्हॉवचर बनविण्यात आलेले आहे. कारण सदर महिला मजूर ही कधीच नर्सरीत कामावर कुणाला दिसली नाही. उलट ती महिला मेश्राम यांच्या क्वॉर्टरवरच कामावर दिसत असल्याची चर्चा आता वनकर्मचाऱ्यांमध्ये रंगू लागली आहे. मागील आठवड्यात मेश्राम यांनी सदर महिलेचे वेतनाचे व्हॉऊचर बनवून वनविभागाच्या कार्यालयात पाठविले. परंतु, ‘लोकमत’मध्ये वृत्त मालिका सुरू असल्याने त्यांनी व्हॉऊचर परत बोलवून फाडल्याचेही वनकर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मेश्राम यांना पाठिशी घालणारे कोण?वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांचे अनेक प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत आहेत. अशा स्थितीत वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यांची चूक स्पष्टपणे दिसत असतानाही त्यांना पाठिशी घालीत आहे. तर पंधरवाड्यापूर्वी उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी क्षुल्लक कारणावरून येथील दोन वनकर्मचाऱ्यांना त्यांची बाजू न ऐकता तडकाफडकी निलंबीत केले. वर्मा यांनी त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतलेली ही भूमिका दुटप्पीपणाची वाटते. त्यामुळे वर्मा यांच्या भूमिकेबाबत वनकर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मेश्राम यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आता वनकर्मचारी करणार असून त्यासाठी वनकर्मचारी स्वाक्षरी मोहिम राबवित असल्याचेही बोलले जात आहे.तीन महिन्यापूर्वी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व डीएफओ बंगल्यावरील नर्सरीत ती महिला मजूर म्हणून कामावर होती. मी तिला माझ्या क्वॉर्र्टरवर झाडूपोछा व स्वयंपाक करून देण्याचे काम दिले. या कामाचे तिला स्वत:कडून आर्थिक मोबदला देत आहे. शासकीय पैशाचा गैरवापर केलेला नाही.-संजय मेश्राम, वनपरिक्षेत्राधिकारी, भंडार