शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जुमदेवजींचे कार्य समाजाला दिशा देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:10 IST

समाजाला दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी केले. समाजात परिवर्तन आणून विकास साध्य करण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार केला.

ठळक मुद्देप्रभाकर वैरागडे : खुटसावरी येथे सामूहिक हवन कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : समाजाला दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी केले. समाजात परिवर्तन आणून विकास साध्य करण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. जात, धर्म आणि पंथ या पलीकडे जाऊन बाबा जुमदेवजी यांनी कार्य केले. मानव धर्माच्या माध्यमातून बाबांचे कार्य व विचार समाजाला दिशा देत राहतील, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे उपाध्यक्ष प्रभाकर वैरागडे यांनी केले.परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ शाखा मोहाडी अंतर्गत खुटसावरी येथे आयोजित सामूहिक हवन कार्य कार्यक्रमाचे उद्घाटन बळीराम ठवकर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मधुकर कुकडे, विठ्ठल कहालकर, सरपंच त्रिशूला दमाहे, उपसरपंच भोदू बसिने, ग्राम पंचायत सदस्य प्रेमलता दमाहे, दुर्गा सिहोरे, संगीता दमाहे, सीमा बसिने, देवदास लिल्हारे, पोलिस पाटील सीमा बसिने, नरेश बिरणवार, पंढरी झंझाड, प्रितम दमाहे, सोहम राजाभोज, राहुल धारगावे, अनिल सपाटे, पंचायत समिती सदस्य निता झंझाड, कालीदास बावने, पवन बशिने, राहुल पिंगरे, अजय भोयर, पोलिस पाटील कल्पना ढबाले, हरिभाऊ ईश्वरकर, बंडू झंझाड, क्रिष्णा लेंडे, रामकृष्ण इलमे, गोकुल मसर्के, महादेव भिवगडे, रामेश्वर जोगी, कुंवर दमाहे, विद्याधर वहिले, मंजुळा ठवकर, पंडीत बशिने, वसंता लिल्हारे, गोखल मसर्के इत्यादी उपस्थित होते.महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्यामुळे समाजातील वंचित समाजाला विकासाची दिशा मिळाली असल्याने बाबांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. समाजातील वाईट प्रथेविरुद्ध समाजात जागृती करून समाजाची सेवा केली.आज सुद्धा त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे. त्यांचे कार्य अजूनही प्रेरणादायी आहे. असे मार्गदर्शन माजी आमदार मधुकर कुकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वी गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. हवन कार्यानंतर गावातील मुख्य रस्त्याने शोभायात्रा काढण्यात आली.सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री वाराणसी आई ठुब्रीकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. महाप्रसाद विरतणानंतर रात्री ९ वाजता गाव उधळला संसाराचा या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन राजहंस काटेकर यांनी केले तर आभार अशोक पिंगरे यांनी मानले.