लाकूड आगार नव्हे... : भंडारा येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात मौल्यवान सागवन वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. वन विभागाने अनेक वर्षे या वृक्षांची जोपासना केली असली तरी अचानक या झाडांची कत्तल होत असल्याने वनप्रेमींमध्ये उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे. विभागाच्या आवारात जणू लाकूड आगाराचे स्वरूप आले आहे.