शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

बचत गटांच्या महिलांचे कार्य प्रशंसनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 22:34 IST

बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढत असून, गावाच्या विकासाकरीता सहकार्य करीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : सानगडी येथील महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढत असून, गावाच्या विकासाकरीता सहकार्य करीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.साकोली तालुक्यातील सानगडी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने शेतकरी व महिला बचतगट मेळावा तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. महिला बचतगट मेळावाप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आमदार सेवक वाघाये, सदाशिव वलथरे, मधुकर लिचडे, नितीन पाटील, उषा करपते, अशोक लिचडे, अविनाश ब्राम्हणकर, रविंद्र खंडाईत, मांडवटकर, वंसता खंडाईत, दीपक चिमणकर, बालु ईटानकर, शिवाजी खंडाईत, रामचंद्र कोहळे, शालिकराम हरडेकर, मनिषा कुरसुंगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सरव्यवस्थापक संजय बरडे आदी उपस्थित होते. खासदार पटेल म्हणाले, भेल कारखाना तयार होऊन कार्यपूर्तीस आला असता, परंतु, भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे आजतागायत भेल कंपनीचे काम पुढे सरकले नाही. त्यामुळे परिसरातील बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे काम या सराकारने केले आहे. त्यांच्या साडेचार वर्षाच्या काळात जिल्ह्यात १० ते २० प्रकल्प आणू शकले असते. परंतु तसेही केले नाही. बेरोजगारांना मोठे आवश्वासने देत, दरवर्षी सत्ताधाऱ्यांनी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली. उलट दीड कोटी बेरोजगार त्यांच्या या अनियोजित निर्णयामुळे बेरोजगार झाल्याने, बेरोगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. शेतकºयांना दुप्पट भाव देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते, तेही फसवे ठरले. आमचे सरकार आल्यास शेतकºयांना क्विंटल मागे अडीच हजार रुपये देणार आहे.आमचे शासन असताना,गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले. तसेच ९० टक्के निधी ओढून आणला. परंतु, मोदी सरकारने या गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाच्या यादीतून वगळून टाकले. तसेच निधीही बंद केल्याने सदर प्रकल्प पुर्ण झाला नाही. संचालन बंडू खंडाईत, बाळकृष्ण हटनागर यांनी केले. आभार रविशंकर लोथे यांनी मानले.खासदार पटेलांनी थोपटली फुंडेची पाठजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील ३३८ बचत गटांना तीन कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या सर्व बचत गटांना कर्ज मंजुरीच्या कर्ज समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करणारी महाराष्ट्रातील पहिली बँक म्हणून भंडारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. त्यामुळे खासदार पटेल यांनी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांची कौतुकाने पाठ थोपटली.