भंडारा : तालुक्यातील धारगाव येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत महिला मेळावा बुधवारी घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी धारगावचे सरपंच संतोष पडोळे होते.
प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अश्विन नंदेश्वर, जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते, बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल निकोसे, अंगणवाडी पर्यवेक्षिका छाया ढोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा कोचे, कोमल बोदेले आदी उपस्थित होते. महिला मेळाव्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी नवदाम्पत्याचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे नृत्य किशोरवयीन मुलींचे नृत्य, पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. संचालन व आभार प्रदर्शन अंगणवाडी पर्यवेक्षिका छाया ढोरे यांनी केले. मेळाव्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सहकार्य केले.