शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

महिलांचा सन्मान महिलांच्याच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:05 IST

आजच्या महिला ताणतणावात जीवन जगत आहेत. त्यांच्याकरिता विकासाची गरज आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते त्यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना दुसऱ्यालाही त्यांचे सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक घरातील सासूने सुनेला मुलीसारख वागवावं व सुनेने देखील मुलीसारखं आपल घर समजावे, म्हणजे घरात सुखशांती व आनंद वातावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन महाथेरी भिक्खुणी विशाखा यांनी काढले.

ठळक मुद्देभिक्खुणी विशाखा यांचे प्रतिपादन : अखिल भारतीय भिक्खुणी परिषद उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजच्या महिला ताणतणावात जीवन जगत आहेत. त्यांच्याकरिता विकासाची गरज आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते त्यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना दुसऱ्यालाही त्यांचे सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक घरातील सासूने सुनेला मुलीसारख वागवावं व सुनेने देखील मुलीसारखं आपल घर समजावे, म्हणजे घरात सुखशांती व आनंद वातावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन महाथेरी भिक्खुणी विशाखा यांनी काढले.अखिल भारतीय भिक्खुणी परिषद विषय बुध्द धम्म आणि स्त्रियांचा विकास काळाची गरज या कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीमाई ग्रुप आॅफ लेडीज व त्रिरत्न महिला मंडळ सिध्दार्थ विहार डॉ. आंबेडकर वॉर्ड भंडारा यांच्या सौजन्याने घेण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भिक्षुणी धम्मसुध्दा, भिक्षुणी उत्तरा, भिक्षुणी कात्यायनी, भिक्षुणी शिलाजीता, सुनिती, भिक्षुणी मैत्रीया, भिक्षुणी विशुध्दी आदी उपस्थित होते.भिक्खुणी संघ हा वेगवेगळ्या शहरातून नागपूरहून एकत्र आल्यात. त्रिरत्न महिला मंडळ सिध्दार्थ विहार डॉ. आंबेडकर वॉर्ड भंडारा येथे प्रस्थान झाले. तेथे भिक्षुणी संघाचे स्वागत होऊन त्रिरत्न महिला मंडळाच्यावतीने भोजनदान देण्यात आले. सिध्दार्थ विहार डॉ. आंबेडकर वॉर्ड भंडारा ते सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे धम्म रॅली काढण्यात आली. तेथे भिक्षुणी संघाचे स्वागत साधना इलमकर व साक्षी शिंपोलकर यांच्या गिताने करण्यात आले. संघाच्या प्रमुख भिक्षुणी महाथेरी विशाखा यांचे हस्ते करण्यात आले. सामूहिक वंदना याप्रसंगी एकुण २८ भिक्षुणींचा संघ उपस्थित होता.बुध्दाचा धम्म हा मानव कल्याणाचा धम्म आहे. म्हणून स्त्रियांनी धम्माला समजून त्याप्रमाणे सदाचरण करावे. शीलाचे पालन करावे. बंधुभाव ठेवावा, स्वत: सुखी व्हावे व दुसºयालाही सुखी बनवावे, कुशल कर्म केल्याने त्याचे फळ चांगले मिळते. यासाठी नैतिक व्यवस्था चांगली असावी, असे प्रतिपादन महाथेरी कात्यायनी यांनी केले.भिक्षुणी विनयशिला यांनी यशोधरा व प्रजापती गौतमी यांनी धम्मात जे योगदान दिले त्यावर प्रकाश टाकला. आजच्या युगातील स्त्री सर्व क्षेत्रात समोर गेली असेल तरी सुध्दा काही स्त्रियांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही असे भिक्षुणी मैत्रिया यांनी सांगितले.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शालिनी कोचे, डॉ. स्नेहा राऊत, सीमा बन्सोड, पविता पाटील, सारंगा वाघमारे, पुष्पा मेश्राम, भाविका उके, माजी सभापती माया उके आहेत.परिषदेसाठी आशा कवाडे , निर्मला उके, सचिन बागडे, न.प. उपाध्यक्ष आशु गोंडाणे, माया उके, न.प. बांधकाम समिती साधना त्रिवेणी, नरेंद्र बन्सोड, अभिजित बागडे, व्ही. डी. बारमाटे, विद्या नागदेवे, दिपक पाटील, मनोहर वाघमारे, शैलेंद्र गजभिये, देवा मेश्राम, राहुल बडोले यांच्यासह लीला रामटेके, महानंदा गजभिये, आशा देशभ्रतार, विजु वासनिक, विरांगणा बागडे, विजयकांता रामटेके, मंगला सतदेवे, कुंदा गजभिये, अल्का सतदेवे, चित्रा गेडाम, कपिला रामटेके, सुचिता गजभिये, पविता पाटील यांनी सहकार्य केले.प्रास्ताविक भाषण भाविका उके, संचालन डॉ. स्नेहा राऊत व वैभवी पाटील यांनी तर, आभार प्रदर्शन शालिनी कोचे यांनी केले.