शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:36 IST

शहरातील प्रभाग १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरीता नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी भंडारा नगर परिषदेवर महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देप्रकरण प्रभाग क्रमांक १४ मधील : आठ दिवसात पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील प्रभाग १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरीता नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी भंडारा नगर परिषदेवर महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगर परिषद प्रशासनाने एका आठवड्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.प्रभाग १४ मध्ये मोठया प्रमाणात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे ते खाजगी नळ घेऊ शकत नाही. या वॉर्डात सार्वजनिक नळ हे बोटावर मोजण्या इतके आहेत. येथील अनेक नळावर दुगंधीर्युक्त पाणी वाहत असते. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे.नवीन पाणीपुरवठा योजनेला अंतिम स्वरूपात येण्यासाठी अजून बराच कालावधी शिल्लक असतांना तोपर्यंत नागरिकांना पाण्याविना ठेवणार काय? असा सवाल यावेळी नगरसेवक नितीन धकाते यांनी प्रशासनाला विचारला.यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोंडाणे, उपमुख्याधिकारी कळंबे यांना नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात वार्ड वासियांनी निवेदन सादर केले. निवेदन देताना सदानंद धकाते, रेणुका धकाते, भाजीखाये, निळकंठ धकाते, संदीप कुंभारे, देवेंद्र कोहाड, सुरेश कोहाड, मीना खेताडे, चंदा हेडाऊ व वाडार्तील पुरुष, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.शहरातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही फार जुनी असुन पुर्णपणे जिर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी लिकेज होवून नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. जीर्ण झालेल्या पाईपलाईनचा शोध घेवून ती दुरूस्त करण्याकरीता जवळपास एका आठवडयाचा कालावधी लागेल.तोपर्यंत प्रभागातील नागरिकांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा केला जाईल.-आशिष गोंडाणे, उपाध्यक्ष, न. प. भंडारापावसाळयात नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवने हे नगर पालीका प्रशासनाचे अपयश आहे. येत्या एका आठवड्यात प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन भंडारा नगर परिषदेने दिले आहे. एका आठवडयात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास नगर पालिकेला घेराव घालून नगर परिषद कार्यालयासमोर नगर परिषद प्रशासनाविरोधात घोषणा देत तिव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगर पालीका प्रशासनाची राहिल.-नितीन धकाते, नगरसेवक, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीटंचाई