शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बांगडी प्रशिक्षणातून मिळणार महिलांना स्वयंरोजगार

By admin | Updated: March 27, 2017 00:31 IST

भंडारा वनविभागांतर्गत ग्रामवन समिती असलेल्या गावातील महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी लाख बांगड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

कोका येथे प्रशिक्षण : ग्रामवन समितीच्या गावातील महिलांचा समावेश भंडारा : भंडारा वनविभागांतर्गत ग्रामवन समिती असलेल्या गावातील महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी लाख बांगड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून ग्रामीण महिला स्वत:च्या पायावर उभ्या व्हाव्या व स्वत:सह कुटुंबाचे उदरनिर्वाह करावे यासाठी त्यांना हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणारे आहे. भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका येथील विश्रामगृह येथे हे प्रशिक्षण पार पडले. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत अभयारण्याच्या कार्यक्षेत्रातील कोका व माटोरा येथील २३ महिलांना पळसाच्या झाडाच्या लाखीपासून बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना त्यांच्या गावातील समिती अध्यक्ष व सचिवांनी प्रोत्साहीत केल्याने त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. बालाघाट (मध्यप्रदेश) येथील सी. के. लाख प्रोसेसिंग इंडस्ट्रीजचे सी.एल. पारधी यांनी बांगड्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले. उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण देण्यात आले. या बांगड्यांना बाजारात १५ ते ५०० रुपये दर मिळतो. दहा दिवसीय प्रशिक्षणाची जबाबदारी श्रीमती फुलनदेवी पारधी रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्था बालाघाटने हे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणार्थ्यांना बांगड्या बनविण्याचा साचा, कच्चे साहित्य व अन्य उपयोगी साहित्य पुरवठा केले. सोबतच तयार करण्यात आलेल्या बांगड्यांसाठी मार्केट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे.एका दिवसात ३०० ते ५०० रुपयांची कमाई या व्यवसायातून करता येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला कोका क्षेत्र सहाय्यक डब्लू. आर. खान, वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे, मुख्याध्यापक कमलेश पारधी, संस्थेचे सी.एल. पारधी, नारायण गौतम, विनोद हनवत, माटोरा ग्रामवन समितीचे अध्यक्ष वैशाली शेंडे, भंडारा क्षेत्र सहाय्यक गौरी नेवारे, ग्रामवन समिती अध्यक्ष वाल्मीक गोबाडे, माटोरा वनरक्षक टी.एम. घुले, कोका वनरक्षक विपीन डोंगरे सोबतच माटोरा व कोका येथील समिती सदस्य तथा पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)