शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 11:09 IST

बनावट आधार कार्ड केले तयार : वय ४९ वरून थेट ७१

राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. चक्क सरपंचांनीच बोगस आधार कार्ड तयार केले. वृद्धापकाळ निर्वाह योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपळगाव (कान्हळगाव) येथील सरपंचाने वय वाढवून लाभ घेण्याचा उपद्व्याप केल्याचा प्रकार पुढे आला आहे.

रेखा ज्ञानेश्वर गभणे असे या सरपंच महिलेचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांनी वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावरून बनावट आधार कार्ड तयार केले. ३७५८ ५०१२ २७२७ या क्रमांकाचे दोन आधार कार्ड तयार करून घेतले. एकावर १० नोव्हेंबर १९७५, तर दुसऱ्या आधार कार्डवर १ जानेवारी १९५३ अशा जन्मतारखा मुद्रित आहेत. त्या दोनपैकी दुसरे आधार कार्ड वापरून त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. खोट्या जन्मतारखेच्या आधार कार्डनुसार त्यांचे वय ७१ वर्षे आहे. प्रत्यक्षात त्यांचे वय ४९ वर्षे आहे. रेखा गभणे या ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या असताना त्यांनी सरपंचपदासाठी ऑनलाइन नामनिर्देशन दाखल केले होते. नामनिर्देशनपत्र दाखल करताना शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर असलेल्या प्रमाणेच ऑनलाइन अर्जातही १० नोव्हेंबर १९७५ ही जन्मतारीख लिहिलेली आहे. त्यांचे माहेर भंडारा तालुक्यातील सिरसी येथील असून, गावच्या शाळेच्या रेकॉर्डवरही १० नोव्हेंबर १९७५ अशीच जन्मतारीख नोंदविलेली आहे, हे येथे उल्लेखनीय. 

असे फुटले बिंग मोहाडी तहसीलदारांमार्फत वृद्धापकाळ निर्वाह योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती. लाभार्थ्यांकडून वयाचे पुरावे जमा करण्यात आले. त्यात रेखा गभणे यांनी वय वाढवून दिलेले आधार कार्ड तलाठ्यांकडे जमा केले. दरम्यानच्या काळात हा प्रकार गावचे उपसरपंच उमेश उपरकर, ग्रामपंचायत सदस्य विजय चोपकर, बिरजलाल गभणे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार करून कारवाईची आणि सरपंचपदावरून अपात्र करण्याची मागणी केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

सरकारची दिशाभूलनिवडणूक लढण्यासाठी टीसीचा आधार घेतला. वृद्धापकाळ निर्वाह योजनेच्या लाभासाठी बनावट आधार कार्डचा वापर केला. दोन्ही आधार कार्ड बघितल्यावर हे लक्षात येते. त्यांच्या आंधळगाव येथील बँक खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये मानधन जमा झाले

"मला वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळत आहे. त्यासाठी आधार कार्ड बनविले, हे मान्य करते. एकटी मीच नाही त्यावेळी गावातील अनेकजण तसेच ग्रामपंचायत सदस्यदेखील या योजनेचा लाभ घेत आहे."- रेखा गभणे, सरपंच, ग्रामपंचायत पिंपळगाव (कान्हळगाव)

 

टॅग्स :fraudधोकेबाजीbhandara-acभंडाराgram panchayatग्राम पंचायत