शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सहा केंद्राचा परवाना रद्द तर २९ कृषी केंद्रांची विक्री बंद

By admin | Updated: June 16, 2016 00:50 IST

खरीप हंगामाला प्रारंभ होत असताना कृषी विभागाने जिल्ह्यातील ३५ कृषी केंद्रांवर कारवाई केली. यात २९ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश बजावले आहे.

अनियमितता भोवली : ३५ कृषी केंद्रांवर कारवाईभंडारा : खरीप हंगामाला प्रारंभ होत असताना कृषी विभागाने जिल्ह्यातील ३५ कृषी केंद्रांवर कारवाई केली. यात २९ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश बजावले आहे. तर सहा कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आले. भरारी पथकाने ऐन हंगामाच्या तोंडावर ही कारवाई केल्याने कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात बि-बियाणे व खतांचा पुरवठा करता यावा, यासाठी कृषी विभागाच्या अखत्यारित कृषी केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. खरीप हंगामाला सुरूवात होत असल्याने या भरारी पथकाने कृषी केंद्र तपासणी केली असता भंडारा जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. यात काही कृषी सेवा केंद्रधारक विना परवाना कृषी निविष्ठा विक्री करीत होते. तपासणीत खते, बियाणे व किटकनाशके विक्रीचा परवाना नसतानाही अनधिकृतरित्या विक्रीचा व्यवहार सुरू असल्याचे आढळून आले. यामुळे भरारी पथकाने २९ कृषी केंद्राचे परवाने विक्री बंद करण्याचे आदेश बजावले आहे. सहा कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अशा ३५ कृषी केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ही कारवाई महिन्याभरात करण्यात आलेली आहे. अनेकांविरूध्द पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)या केंद्रांवर करण्यात आली कारवाईविक्री बंद आदेश हे २१ दिवसांसाठी असून परवाना रद्द हा कायमस्वरूपी करण्यात आलेला आहे. ज्या २९ कृषी केंद्रांवर विक्री बंदची कारवाई केली त्यात २४ बियाणे, एक खत व चार किटकनाशक विक्री करणारे कृषी केंद्र आहेत. तर परवाना रद्द करण्यात आलेल्या सहा कृषी केंद्रांमध्ये दोन बियाणे, तीन खत व एक किटकनाशक विक्री करणाऱ्या कृषी केंद्राचा समावेश आहे.तालुकानिहाय कारवाई जिल्हा कृषी विभागाच्या अखत्यारित असलेल्या कृषी केंद्र संचालकांकडून शासकीय नियमांना बाजूला सारून कृषी खते व बियाणे विक्रीचा गोरखधंदा सुरू होता. दरम्यान भरारी पथकाने ३५ कृषी केंद्रांवर कारवाई केली. यात तालुकानिहाय याप्रमाणे, भंडारा सहा, लाखनी तीन, मोहाडी सहा, साकोली ११, पवनी तीन, लाखांदूर तालुक्यातील सहा कृषी केंद्रांचा समावेश आहे.जिल्ह्यातील कृषी केंद्रांची स्थितीजिल्ह्यात १ हजार ६०० कृषी केंद्र आहेत. त्यात ४८२ कृषी केंद्रांना बियाणे विक्रीचा परवाना देण्यात आलेला आहे. ६८६ कृषी केंद्रांमधून खतांची विक्री होते. तर ४३२ कृषी केंद्रांमधून किटकनाशकांची विक्री होते. सर्वाधिक २८६ कृषी केंद्र तुमसर तालुक्यात आहेत. मोहाडीत २८०, भंडारा २३८, पवनी २२८, लाखांदूर २१६, साकोली १८८ तर लाखनी तालुक्यात १६४ परवानाधारक आहेत.