शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पवनीतील पर्यटन विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:06 IST

पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता येथील पर्यटनात आहेत.

ठळक मुद्देदुर्लक्ष : नियोजनाचा अभाव, रोजगाराच्या संधीलाही ‘खो’

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता येथील पर्यटनात आहेत. पर्यटन प्रेमी व युवक वर्ग येथील पर्यटन विकासाकडे नवी दिशा देणारे ‘टुरीजम डेव्हलपमेंट व्हिजन’च्या नजरेने बघत आहे. पण राज्य व केंद्रस्तरावर येथील पर्यटन विकासाकरिता काहीही नियोजन व ‘मार्केटिंग’ नसल्यामुळे पर्यटनाचा विकास झाला नाही.विदर्भातील सर्वात मोठे महत्वकांक्षी गोसीखुर्द धरण, रूयाड येथील पत्र्त्रा मेत्ता संघ द्वारा निर्मित आंतरराष्ट्रीयस्तराचा महासमाधी महास्तुप, उमरेड, करांडला अभयारण्याचे पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्र शहरातील प्राचीन ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, टेंभ्येस्वामी मंदिर, राझीचा गणेश, वैजेश्वर मंदिर आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे.मागील तीन-चार वर्षांपासून पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. रोज मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. पवनी शहराची व तालुक्याची ओळख राज्य व राष्ट्रीय स्तरावर पर्यटनस्थळाच्या रूपात होत आहे. या शहराचा रामटेकच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पूर्ण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शहराचे गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे. शहरात व तालुक्यात पर्यटन वाढीकरिता सर्व काही आहे. पण पर्यटनवाढी करिता काहीही नियोजन झाले नाही. मार्केटिंग नसल्यामुळे राज्य व केंद्रस्तरावर येथील पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली नाही. येथील पर्यटन स्थळाला शासनाच्या महत्वाच्या पर्यटन स्थळाच्या यादीत आणणे, विकास करणे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे आदी विषयी एक पर्यटन विषयक आराखडा तयार करून पाठपुरावा शासनाकडे करणे गरजेचे आहे. पण याकडे पर्यटन विकासाकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे येथील पर्यटन विकास रखडला आहे.