नेरला उपसा सिंचन सुरू होऊन पाच वर्षे झालीत. त्यात २०१८-१९,२०१९-२० ची वसुली करणे सुरू आहे. पण २०२०-२१ चे रेट अद्याप आले नसल्याने, म्हणजे शेतकऱ्यांना एकूण तीन वर्षांचा पाणीपट्टी कर भरायचा आहे.
संबंधित विभाग आज ज्या धडाडीने वसुलीच्या कामाला लागले आहेत, हाच प्रयत्न जर त्याचवेळी केला गेला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही बोलले जात आहे. पाणी वापर संस्थेतील पदाधिकारी पाणीपट्टी कर वसुली करण्यासाठी जितकी धावपळ आता करताना दिसतात, मग हीच कामे आधीच केली असती, तर अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच असती, असेही आज बोलले जात आहे.