सभेत अर्जीत रजेचे वेतन काढणे, भविष्य निर्वाह निधीचे नवीन खाते उघडणे, मूळ सेवापुस्तिका अद्ययावत करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या अनुदानाची मागणी करणे, वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव जि. प. ला पाठवणे, विषय शिक्षकांच्या नोंदी मूळ सेवापुस्तिकेमध्ये घेणे, सेवापुस्तिका अद्ययावत करण्यासाठी केंद्रनिहाय शिबिरे आयोजित करणे, दुय्यम सेवापुस्तिका अद्ययावत करणे, परीक्षेला बसण्याची परवानगी देणे, कनिष्ठ सहायक ढबाले यांना शिक्षण विभागातून काढणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
मूळ सेवापुस्तिका अद्ययावत करण्यासाठी ३० मार्चपासून केंद्रनिहाय शिबिर आयोजित करणार असून, नोंदी अद्ययावत करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही गटशिक्षणाधिकारी एस. बी. राठोड यांनी शिष्टमंडळाला दिली.
शिष्टमंडळात शिक्षक नेते दिलीप बावनकर, संचालक शंकर नखाते, प्रकाश चाचेरे, यामीनी गिऱ्हेपुंजे, नामदेव गभणे, तालुकाध्यक्ष दशरथ जिभकाटे, सरचिटणीस ईश्वर निकुडे, जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, दिलीप गभणे, संजय बनकर, प्रमोद गेडाम, शोभा बारी, गीता तलमले, साधना जांभुळकर, वसंता काटेखाये, रवींद्र फंदे, तुलसीदास रुषेसरी, तुलसी हटवार, देविदास लोहकर, सुनील चव्हाण, विलास दिघोरे, मधुकर लेंडे, अनिल दहिवले, कैलाश बुद्धे, नरेंद्र कोहाड, सोनीराम लांजेवार, राजेश देशमुख, दिनेश खोब्रागडे, धनराज साठवणे, प्रभू तिघरे, भोजराज अंबादे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. शिष्टमंडळ सभेचे संचालन तालुका सरचिटणीस ईश्वर निकुडे यांनी, तर आभार तालुकाध्यक्ष दशरथ जिभकाटे यांनी मानले.