शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या निराधारांचे पैसे बंद होणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:11 IST

Bhandara : जिल्ह्यात २.५० लाखांच्या वर लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केला होता. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली. मात्र, ज्या महिलांना निराधार योजनेतून अनुदान मिळत असेल, अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे.

निराधार व्यक्ती, अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजार, घटस्फोट किंवा दुर्लक्षित महिला, अत्याचारग्रस्त महिला, तृतीयपंथी आदींना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थीना श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेत सामावून घेतले जाते.

जिल्ह्यात अनेक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यांना नियमित अनुदान मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाने या महिलांना नियमित अनुदान देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित आहेत. २.५० लाखांच्या वर लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आहेत. सदर महिलांना केव्हा लाभ मिळणार, याची प्रतीक्षा आहे. आपल्या बैंक खात्यात पैसे केव्हा जमा होतील, याची त्या वाट बघत असतात.

फेब्रुवारीपासून अनुदान होणार बंद दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान बंद होणार आहे. यासाठी प्रशासनाने कागदपत्रांची छाननी सुरू केली असल्याची माहिती आहे.

आधार, बँक पासबूक जमा करण्याची प्रक्रिया सुरु संजय गांधी निराधार योजनेचा लाभघेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बँक पासबुक महसूल विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 

काही दिवसांत ही प्रकिया पूर्ण होणार आहे. ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांची पडताळणी केली जाणार आहे.

कागदपत्रे जमा न केल्यास अनुदान होणार बंद ज्या निराधार महिलांनी महसूल विभागाकडे कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांना पुढे मिळणारे अनुदान बंद होणार आहे. विशेष म्हणजे, यातून छाननी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत. त्यांना आता अडचणी भेळसावणार असून, त्यांचे अनुदान बंद होणार आहे.

२४ जानेवारीपासून लाभमिळण्यास सुरुवात लाडकी बहीण योजनेंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात दि. २४ जानेवारीपासून जमा होण्यास प्रारंभ झाला आहे

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाbhandara-acभंडारा