शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राईबच्या समस्या लवकरच सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:13 IST

जिल्ह्याच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. यावेळी संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना विविध विषयावर निवेदन देण्यात येवून चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन। महाराकास्ट्राईबच्या समस्या लवकरच सोडविणार राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले.यावेळी संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना विविध विषयावर निवेदन देण्यात येवून चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडारा यांचे कार्यालय जिल्हा परिषद परिसर भंडारा येथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचेसोबत आमदार संजय पुराम उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष अरूण गाडे यांनी डॉ.परिणय फुके यांना पुष्पगुच्छ व शाल देवून स्वागत केले.यावेळी महाराष्ट्र राज्य पूणे संघटनेचे उपमहासचिव सुर्यभान हुमने, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, जिल्हा सचिव हरिश्चंद्र धांडेकर, डॉ. मधुकर रंगारी, डॉ.विनोद भोयर, उपाध्यक्ष सिध्दार्थ भोवते तसेच संघटनेच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, नोव्हेंबर २००५ नंतर शासनसेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, कंत्राटी कर्मचाºयांना नियमित करण्यात यावे, जिल्ह्यातील रिक्त पदांवर स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, भूविकास बँकेतील कर्मचाºयांचा थकीत वेतन व इतर थकीत भत्ते त्वरित अदा करणे, भंडारा जिल्ह्यातील वर्दळीच्या चौकात ट्राफीक सिग्नल लावण्यात यावे, नदीचे पाणी दुषित झाले असून शूध्द पाणी पुरवठा करण्यात यावा याकरिता अद्यावत जलशुध्दीकरण यंत्र बसविणे, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मागासवर्गीयांना पदोन्नती देण्यात यावी, समान काम समान वेतन देण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आरोग्य सेविका, सहाय्यीका यांच्या नविन वेतनाप्रमाणे असलेली तफावत दूर करण्यात यावी, तसेच गत दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत असून त्यांना रिक्त पदावर विना शर्त सामावून घेण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.याप्रसंगी संघटनेचे विधी सल्लागार अ‍ॅड. बी. जी. दामले, सहसचिव यशवंत उईके,मुन्ना ठाकूर, विनोद बन्सोड, अविनाश टांगले, अजय रामटेके, हंसराज बडोले, ओमप्रकाश उके, ओमप्रकाश शामकुवर, शामराव हाडके, रुपेश हुमने, वन कामगार संघटनेचे युवरज रामटेके, एसटी संघटनेचे विजय नंदागवळी, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष घरडे, अचल दामले, हरिकिशन अंबादे, जयेव धांडे, मुकेश साकुरे, रुपल भोंगाडे, राज काटेकर, वर्षा रामटेके, कविता चोपकर, वैशाली जगणे यांच्यासह विविध संघाटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुके