शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:06 IST

आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांनी कर्जमाफिकरिता अर्ज सादर केले. पारदर्शीपणाकरिता हे योग्य जरी असले तरी शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईन तथा आधारकार्ड लिंकींग सपशेल फेल ठरली आहे.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे प्रतिपादन : रेंगेपार येथे घरकुलाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांनी कर्जमाफिकरिता अर्ज सादर केले. पारदर्शीपणाकरिता हे योग्य जरी असले तरी शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईन तथा आधारकार्ड लिंकींग सपशेल फेल ठरली आहे. केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याकरिता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा धानाची पेंढी संसद परिसरात जाळणार असून शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.रेंगेपार येथे आयोजित शेतकरी मेळावा व ६० घरकुल बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रमेश पारधी होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.माजी सभापती कलाम शेख, पं.स. चे गटनेते हिरालाल नागपुरे, माजी सरपंच शिवलाल नागपूरे, सरपंच कौसल नागपुरे, उपसरपंच हेमलता हरडे, खंडविकास अधिकारी आर.एम. दिघे, नायब तहसीलदार निलेश गौंड, उपविभागीय वीज अभियंता रूपेश अवचट, गजानन झंझाड, माजी पं.स. सदस्य बंटी बानेवार उपस्थित होते.खा. नाना पटोले म्हणाले, यावर्षी धान पिकावर तुडतुडा किडीचे संक्रमण झाल्याने धान पिक उद्वस्त झाले. शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ १० टक्के पीक झाले आहे. विमा कंपनीकडून शेतकºयांना आर्थिक मदत शासनाने मिळवून देण्याची गरज आहे. विमा कंपनीत शेतकºयांनी पैसे भरले ते त्यांना परत मिळणे गरजेचे आहे. सरकार येथे जर गंभीर नसेल तर येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसद भवन परिसरात पुन्हा धानपेंढी जाळण्याची पुरावृत्ती करणार आहे. माझे पद गेले तरी चालेल. शेतकºयांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा खा. पटोले यांनी दिला.तत्पूर्वी रेंगेपार पूरग्रस्तांकरिता ६० घरकुल कामांचे भूमिपूजन खा. नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले. यापूर्वी १५ घरकुल मंजुर झाले होते. याप्रसंगी माजी. जि.प. सदस्य अशोक उईके, कमलाकर निखाडे, बालकदास ठवकर, प्रमोद कटरे, मिलिंदभाऊ अंबादास कानतोडे, जयदेव नागपूरे, आशा तिवाडे, भारती दमाहे, विजय दमाहे, नरेंद्र पेशने, मुकूंदा आगाशे, रूपलाल आगाशे तथा देवस्थान कमिटी सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संयोजक हिरालाल नागपूरे यांनी मानले.