शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

नवीन नगरपंचायतींच्या कार्यकक्षा कधी ठरणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2015 01:36 IST

राज्यात २३९ नगरपरिषदा ंअसून त्यामध्ये नव्याने १०० नगर पंचायती समाविष्ट झालेले आहेत.

नगरपंचायत इमारतीचा प्रश्न कायमभंडारा : राज्यात २३९ नगरपरिषदा ंअसून त्यामध्ये नव्याने १०० नगर पंचायती समाविष्ट झालेले आहेत. या नवनिर्मित नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३० नोव्हेंबरला होत आहे. मात्र, या नगर पंचायतींच्या कार्यकक्षा अद्याप स्पष्ट ठरलेल्या नाहीत. मुख्यधिकाऱ्यांच्या नियुक्ती झालेली नसल्यामुळे या नवनिर्मित नगर पंचायतींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील २३९ नगर परिषदांच्या कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य आणि मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहेत. परंतु, नवनिर्मित १०० नगर पंचायतींची कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य याविषयी कुठलिही मार्गदर्शक तत्त्वे अद्यापही नगरविकास विभागाने स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे केवळ नगर परिषद आणि नगर पंचायतींना सारखे अधिकार आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र याविषयी राज्य शासनाचे कुठलेही स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे सर्व कारभार राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार सुरू राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांचे समायोजन केव्हा होणार? तालुका मुख्यालयी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतींमध्ये करण्यात आले. ग्रामपंचायतमधील कर्मचारी वर्गाचे समायोजन नगरपंचायतींमध्ये बिंदूनामावली व शिक्षणानुसार करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. प्रत्यक्षात कुठलिही कार्यवाही नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न कायम आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना कक्ष नाहीतनगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, विरोधी पक्षनेते यांना स्वतंत्र कक्ष असावयास पाहिजे. परंतु सध्या अस्तित्वात असणाऱ्या नगरपंचायतींमध्ये अशाप्रकारे कुठलीही सुविधा नाही. या सुविधा निर्मितीसाठी नगरविकास विभागाचे कुठलेही निर्देश नाहीत. नगराध्यक्ष राहणार पैदलराज्यात २३९ नगर परिषदांच्या अध्यक्षांना व मुख्याधिकाऱ्यांना शासकीय वाहने आहेत. परंतु नगरपंचायतीच्या अध्यक्षांना शासकीय वाहन मिळणार किंवा नाही. याविषयी कुठल्याही सूचना नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षांना पायीच नगरांची परिक्रमा करावी लागणार आहे.