शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आडवाटेने येणार काय भंडाऱ्यात कोरोना ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:16 IST

परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत .

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती , व्यापारी व अन्य लोकांची वर्दळ थांबविण्याची मागणी

राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत .कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. जमावबंदी, टाळेबंदीने सगळे घरीच थांबले आहेत. काही  व्यवसाय जागीच अडकले आहेत. पण,  लोक लॉकडाऊनला न घाबरता व्यवसायासाठी बाहेर पडत आहेत. एवढ्यावर न थांबता काही व्यापारी चोर वाटेने दुसºया जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. मोहाडी तालुक्यातील सीतेपार झंझाड, पांढराबोडी, काटी, धूसाळा ही गावे नागपूर जिल्ह्याच्या सीमा रेषेवर आहेत.नागपूर जिल्ह्यातील व्यापारी या आडमार्गाच्या गावावरून सहजतेने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. सध्या लॉकडाऊन आहे. पोलीस विभागाने भंडारा जिल्ह्याच्या मुख्य मार्गाची सीमाबंदी केली आहे. सीमा बंदस्थानी चोवीस तास पोलीस विभाग तैनात आहेत. परजिल्ह्यातील लोक दुसºया जिल्ह्यात जावू नयेत यासाठी  नागपूरचा राज्यमार्ग, खात-रामटेक  रोड, शहापूर मार्ग, कांद्री-रामटेक मार्ग, मध्यप्रदेश मार्ग आदी  भंडारा जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.नागपूर जिल्ह्यातील लोकांना वायगाव, मुरमाडी मार्गाने भंडाºयाच्या सीमेत येता येते. तसेच पांढराबोडी, काटी वरून धानोली, वाकेश्वर  मार्ग, धूसाळावरून धानोली, कोदामेडी या आड मार्गानेही  नागपूर व  कामठी येतील बरीच मंडळी भंडारा जिल्ह्यात पाय ठेवत आहेत. पश्चिमेकडील ही गावे नागपूर जिल्ह्याच्या अगदी टोकावर आहेत. त्यामुळे मौदा,  कामठी, नागपूर येथील गाय, म्हशी, शेळ्या घेणारे व्यापारी भंडारा जिल्ह्यात दररोज प्रवेश करीत आहेत.नागपूरच्या उपराजधानीत आतापर्यंत ५६ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झाली आहे. अनेक संशयीत रुग्ण आढळून आली आहेत. त्यामुळे उपराजधानी कोरोनामुळे अधिक धोकादायक स्थितीत आहे. अशा वेळी नागपूर जिल्ह्यातील लोक भंडारा जिल्ह्यात येत असल्याने पांढराबोडी, धूसाळा, काटी, सीतेपार, हरदोली आदी परिसरातील  गावातील लोकांमध्ये कोरोना या आडमार्गाने येणार तर नाही ना, ही भीती सतावत आहे.आता तर ग्रामस्थानी असे आड मार्ग अडविण्यास पुढाकार घेतला आहे. हत्तीडोई येथील ग्रामस्थांनी भीतीमुळे नागपूर वरून येणारा रस्ता बंद केला आहे. हत्तीडोई याही मार्गाने लोक भंडारा जिल्ह्यात शिरत आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोनाचे एकही रुग्ण नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.प्रशासन झाले सतर्कहरदोली येथील सरपंच सदाशिव ढेंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट  संवाद साधला. या गंभीर विषयाची माहिती दिली. दोन दिवसात असे आड मार्ग बंद केले जातील, असे आश्वस्त जिल्हाधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस