पवनी वनपरिक्षेत्रात २९४ वन्यप्राणी : अड्याळ वनपरिक्षेत्रात ६१७ वन्यप्राण्यांची नोंदलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्रादेशिक वनविभागाचा जंगलात वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. पवनी वनपरिक्षेत्रात २९४ व अड्याळ वनपरिक्षेत्रात ६१७ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. अड्याळ येथील एका वन्यप्राणी गणना स्थळावर नागपुरच्या महाविद्यालयी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.प्रादेशिक वनविभागाच्या पवनी जंगलामध्ये सिंधी तलाव, गुडेगाव तलाव, सावरला तलाव, शिवनाळा रोपवाटिका, वाही, जलाशय, सिरसाळा तलाव क्र.१, सिरसाळा तलाव क्र. २, वायगाव तलाव, मोहझरी तलाव या तलावावर ९ मचाणी लावून वन्यप्राणी गणना करण्यात आली. या मध्ये चितळ ८०, हरिण ११, चौसिंगा १, सांबर ३, निलगाय ५०, रानडुक्कर ८३, रानकुत्रे १२, मोर २४, माकड २७ अशा एकुण २९४ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. सर्वच गणना स्थळावर वन्यप्राणयंची नोंद करण्यात आली. या वन्यप्राणी गणनेत ३० प्रगणक व वनकर्मचारी सहभागी झाले होते. वन्यप्राणी गणनेकरिता वनक्षेत्राधिकारी डी.एन. बारई, क्षेत्र सहाय्यक नागदेवे, केवट, खान, शिवणकर व वनकर्मचायांनी विशेष परिश्रम घेतले.अड्याळ वनक्षेत्रात एकुण १४ पानवठ्यावर १४ मचाणी लावून वन्यप्राणी गणना करण्यात आली. यामध्ये भिवखीडकी केंद्रावर, नागपूर येथील कमला नेहरु महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. उर्वरीत १३ गणना केंद्रावर २६ प्रगणक व वनकर्मचारी सहभागी झाले होते. येथे बिबट ३, चितळ ७५, हरिण १४, सांबवर ३५, निलगाय १२, रानडुक्कर २६५, अस्वल १०, रानकुत्रे ७, भेडकी २, मोर ३, ससे ३, लांडगा २, माकडे १७६ अशा एकुण ६१७ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. वन्यप्राणी गणनेकरिता वनक्षेत्राधिकारी डी.एन. बारई, वनक्षेत्रसहाय्यक सारवे, वालदे, टेंभुर्णीकर, मेश्राम व सर्व वनकर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.ही प्राणीगणा १० मे ला दुपारी १२ वाजता सुरु ुहोवून ११ मे ला दुपारी १२ वाजता संपली.
प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात वन्यप्राणी गणना
By admin | Updated: May 18, 2017 00:40 IST