शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ताटात हात धुतला म्हणून पत्नीने पतीलाच बदडले; गावभर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 12:31 IST

काठीचा एक जोरदार प्रहार डोक्यावर झाल्याने राजेंद्रचे डोके फुटून रक्त निघू लागले.

ठळक मुद्देउसरागाेंदीची घटना : पतीच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा

भंडारा : जेवण वाढल्यानंतर भात-भाजी असलेल्या ताटात हात धुणे पतीला चांगलेच महागात पडले. भरलेल्या ताटात हात धुतला म्हणून संतापलेल्या पत्नीने चक्क पतीला बांबूच्या काठीने बदडून काढले. ही घटना भंडारा तालुक्यातील उसरागोंदी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून कारधा ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याची सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे.

राजेंद्र दुधाराम वाढेवे (वय ३६) असे पतीचे नाव असून उमा राजेंद्र वाढवे (३०) असे पत्नीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पती राजेंद्रने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. पत्नीने ताटात आंबिल, भात, भाजी वाढली. राजेंद्रने ताटातील आंबिल प्राशन केली. मात्र ताटात भात आणि भाजी असताना हात धुतला. अन्न असलेल्या ताटात पतीने हात धुतल्याने उमा संतापली. याबाबत तिने त्याला जाब विचारला. मात्र पतीने वाद सुरू केला. यामुळे आणखी संतापलेल्या उमाने हातात बांबूची काठी घेऊन पतीला बदडायला सुरुवात केली. काठीचा एक जोरदार प्रहार डोक्यावर झाल्याने राजेंद्रचे डोके फुटून रक्त निघू लागले.

हा प्रकार सुरू असताना शेजाऱ्यांची गर्दी झाली होती. यापैकीच कुणीतरी राजेंद्रला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर राजेंद्रने पत्नीविरुद्ध तक्रार देण्यासाठी कारधा ठाणे गाठले. पत्नीविरुद्ध तक्रार, तीही पतीच देत असल्याने काही वेळी पोलीसही अचंबित झाले. मात्र नंतर उमा वाढवे विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास हवालदार थेर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार