शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जेवणाळा ते पालांदुर रस्त्याचे रुंदीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST

भंडारा : जेवणाळा ते पालांदूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम रखडले असून, या रस्त्याचे काम सुरू ...

भंडारा : जेवणाळा ते पालांदूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम रखडले असून, या रस्त्याचे काम सुरू करण्याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी व वाहनचालकांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, याविरोधात तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा भीम शक्ती संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

लाखनी तालुक्यातील पालांदूर हे सर्वात मोठे गाव असून, येथे शाळा, महाविद्यालय, विविध बँका, पोलीस स्थानक, रुग्णालय व बाजारपेठ असून, परिसरातील नागरिकांना दररोज विविध कामानिमित्त पालांदूर येथे यावे लागते. तसेच मानेगाव ते पालांदूर या मार्गावरून लाखांदूर, अड्याल, पवनी, गडचिरोली, चंद्रपूरकडे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू आहे तसेच पादचारी, सायकलस्वार, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना सतत प्रवास करावा लागतो, एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात विद्यार्जन करण्यासाठी जावे लागते, नागरिकांना बँकेच्या कामानिमित्त ये-जा करावी लागते तसेच रुग्णांना औषधोपचारांसाठी पालांदूर येथील रुग्णालयात जावे लागते. आठवडा बाजाराच्या निमित्ताने या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे मानेगाव ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून, मानेगाव ते गुरढाया गावापर्यंत रुंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक जेवणाला ते पालांदूरपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम रखडले असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना कमालीचा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

जेवणाला ते पालांदूर रस्त्याचे काम सुरू न करण्याचे कारण काय? या रस्त्याचे काम ज्या एजन्सीला देण्यात आले त्यांनी काम सुरू करण्यास अतिविलंब करण्याचे कारण काय? या रस्त्याचे काम सुरू करणार किंवा कसे, याला जबाबदार कोण, आदी प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून, भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम तत्काळ सुरू करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, कोमल कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यशवंत घरडे, जितेंद्र खोब्रागडे, सुरेश गेडाम, नितीश काणेकर, निकाराम शेंडे, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, शांताराम खोब्रागडे यांनी केली आहे.