शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

जेवणाळा ते पालांदूर रस्त्याचे रुंदीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:06 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर सर्वात मोठे गाव असून येथे शाळा, महाविद्यालय, विविध बँका, पोलीस ठाणे, रुग्णालय व बाजारपेठ असून ...

लाखनी तालुक्यातील पालांदूर सर्वात मोठे गाव असून येथे शाळा, महाविद्यालय, विविध बँका, पोलीस ठाणे, रुग्णालय व बाजारपेठ असून परिसरातील नागरिकांना दररोज विविध कामानिमित्त पालांदूर येथे आवागमन करावे लागते. तसेच मानेगाव ते पालांदूर या मार्गावरून लाखांदूर, अड्याळ, पवनी, गडचिरोली, चंद्रपूरकडे राज्य परिवहन महामंडळ विभागाची बससेवा सुरू आहे. तसेच पादचारी, सायकलस्वार, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना सतत प्रवास करावा लागतो, एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात विद्यार्जन करण्यासाठी जावे लागते. नागरिकांना बँकेच्या कामानिमित्त ये-जा करावी लागते तसेच रुग्णांना औषधोपचारासाठी पालांदूर येथील रुग्णालयात जावे लागते. आठवडी बाजाराच्या निमित्ताने या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे मानेगाव ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. मानेगाव ते गुरढा या गावापर्यंत रुंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले. परंतु माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक जेवणाळा ते पालांदूरपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम रखडले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन सदर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे. एस.के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमणे, कोमल कांबळे, जयपाल रामटेके, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, नंदू वाघमारे, तोताराम दहिवले, महादेव देशपांडे, अरुण ठवरे, दामोधर उके, नत्थू सुर्यवंशी, उमाकांत काणेकर, अविनाश खोब्रागडे, यशवंत घरडे, मोरेश्वर लेधारे, जितेंद्र खोब्रागडे, सुरेश गेडाम, नितीश काणेकर, निकाराम शेंडे, सुभाष शेंडे, अविनाश बोरकर, शांताराम खोब्रागडे यांनी केली आहे.