शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर तलावावर कुणाची एकाधिकारशाही?

By admin | Updated: May 4, 2017 00:25 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. तुमसर तालुक्यातील चांदूपर तलाव हा जिल्ह्यातील क्रमांक दोनचा तलाव आहे.

मासेमार कंत्राटावर प्रश्नचिन्ह : संबंधित विभागाचे दुर्लक्ष

मोहन भोयर तुमसरभंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. तुमसर तालुक्यातील चांदूपर तलाव हा जिल्ह्यातील क्रमांक दोनचा तलाव आहे. तलावाची देखभाल व नियंत्रणाकरिता स्वतंत्र कार्यालय अस्तित्वात आहे. मागील अनेक वर्षापासून तलावात मासेमारीचे कंत्राट एकाच संस्थेकडे येथे जाते. तलावात विना परवानगीने बोटींग केली जाते. संबंधित विभागाची यास परवानगी नाही. चांदपूर तलावावर एकाधिकारशाही कुणाच्या आर्शिवादाने सुरू आहे. हा संशोधनाचा विषय आहे.सातपुडा पूर्वत रांगात विस्तीर्ण परिसरात चांदपूर येथे जिल्ह्यातील दोनचा मोठा तलाव आहे. सिहोरा परिसरात सिंचन करणारा एकमेव तलाव असून सोंड्या उपसा सिंचन योजनेतून या तलावात पाणी उपसा दरवर्षी केले जाते. भर उन्हाळ्यातही या तलावात पाणी साठा उलपब्ध राहतो. सध्या या तलावात सुमारे ६ ते ८ टक्के जलसाठा आहे. पावसाळ्यात व हिवाळयात जिथवर नजर जाते तिथपर्यंत पाणीच पाणी येथे दिसते. राज्य शासनाने तालवाच्या देखरेख व नियंत्रणाकरिता स्वतंत्र कर्मचारीवर्ग येथे नियुक्त केले आहे. हे विशेष.या तलावात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारीला येथे मोठे वाव आहे. उन्हाळ्यात तलावात शेती लागवड केली जाते. सध्या टरबुजाची शेती येथे करण्यात आली आहे. चार ते पाच गावचे नागरिक मासेमार बांधव येथे शेती करतात. शेती करण्याकरिता त्यांनी तुमसर येथील चांदपूर तलाव प्रकल्प कार्यालयातून परवानगी घेतली आहे. त्यांनी महसूल सुद्धा असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.मासेमारी करण्याकरिता निविदा प्रक्रिया येथे राबविली जाते. प्रत्येक वेळी काही ठराविक मासेमारी करणाऱ्या संस्थेलाच येथे मासेमारीचे नियमीत कंत्राट येथे मिळत असल्याची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यात केवळ तीन तलावात मासेमारीकरिता स्वतंत्र निविदा काढली जाते. अशी माहिती आहे. विशेषत: मत्स्य संघ हा मोठा आहे. मस्त्य संघाकडे भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव वर्ग करण्यात आल्याचे समजते. वारंवार एकाच मत्स्य संघाला कंत्राट का मिळत आहे हा संशोधनाचा विषय आहे.‘बोटींग’चा अवैधरित्या व्यवसायया तलावात एक लहान बोट आहे. डिझेलवर ही बोट चालते. स्थानिक काही जण येथे अवैध बोटींग करीत आहेत. चांदपूर देवस्थान असल्याने येथे भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. तलावाकडे भ्रमंतीकरीता ते जातात. पर्यटकांना मोह आवरता येत नाही अवैध बोटींगचा व्यवसाय मागील अनेक महिन्यापासून सर्रास सुरू आहे. सध्या जलसाठा कमी झाल्याने तो मंदावला आहे. दरवर्षी बोटींग मधून येथे कमविणे सुरू आहे. रेस्कू पथक येथे नाही. बोटींगचे नियम येथे पायी तुडविले जातात. धोक्याची शक्यता येथे नक्कीच आहे. बोटींगला येथे कुणाची आशिर्वाद आहे हा खरा प्रश्न आहे. आर्शिवादाशिवाय ते शक्य नाही. नागपूर येथील मुख्य कार्यालयात बोटींग करण्याकरिता परवानगीचे पत्र संबंधिताने दिल्याचे समजते.चांदपूर तलाव टरबुज शेतीचे महसूल नियमानुसार भरण्यात आले. मासेमारीची प्रक्रिया मत्स्यविभागाकडून केली जाते. बोटींगची परवानगी या तलावात नाही. नागपूर येथून मुख्य कार्यालयातून ती प्राप्त होते. मार्च महिन्यात मी रूजू झालो आहे. यापुढे येथे नियमानुसार कारवाई केली जाईल. -जे.आर. हटवार, उपविभागीय अभियंता चांदपूर प्रकल्प तुमसर.चांदपूर तलावात मासेमारीची निविदा काढण्यात येते. जिल्ह्यात तीन तलावांची निविदा काढली जाते. निविदेअंतर्गत मासेमारीचे कंत्राट प्राप्त होते. बोटींगची परवानगी नागपूर कार्यालयातून नियमानुार प्राप्त होते. नियमबाह्य कामे केल्यावर निश्चितच कारवाई केली जाते. -विश्वभंर पसारकर, प्रभारी मत्स्य उपआयुक्त भंडारा.