शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

सभापतिपद कुणाला ?

By admin | Updated: July 12, 2015 00:40 IST

जिल्ह्यातील सात पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतिपद निवडीकरिता रविवारला दुपारी २ वाजता विशेष सभा होत आहे.

निवडणूक आज : भाजपची चार तर काँग्रेसचे तीन तालुक्यात सत्ताभंडारा : जिल्ह्यातील सात पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतिपद निवडीकरिता रविवारला दुपारी २ वाजता विशेष सभा होत आहे. भंडारा, तुमसर, साकोली व मोहाडी पंचायत समितीत भाजपला तर पवनी, लाखनी व लाखांदुरात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यांना पदाचा मान मिळणार असला तरी खुर्चीवर बसण्यासाठी उमेदवारांची नेत्याकडे फिल्डिंग सुरू आहे. साकोली पंचायत समितीत सभापतिपद अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता राखीव असून १२ जागांपैकी ८ भाजप तर ४ काँग्रेस असे बलाबल आहे. याठिकाणी सानगडी क्षेत्रातून निवडून आलेले भाजपचे धनपाल उंदीरवाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लाखनी पंचायत समितीत सभापतिपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाकरीता राखीव असून १२ जागांपैकी ८ काँगे्रस, ३ भाजप आणि १ अपक्ष असे बलाबल आहे. याठिकाणी केसलवाडा क्षेत्रातून निवडून आलेले काँग्रेसच्या रजनी आत्राम यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण आरक्षित पदासाठी त्या एकमेव उमेदवार आहेत. लाखांदूर पंचायत समितीत सभापतिपद नागरिकांचा मागास महिला प्रवर्गाकरीता राखीव असून १२ जागांपैकी ७ काँग्रेस, ४ भाजप, १ राष्ट्रवादी असे बलाबल आहे. याठिकाणी बारव्हा क्षेत्रातून निवडून आलेले काँग्रेसच्या मंगला बगमारे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.भंडारा पंचायत समितीत सभापतिपद नागरिकांचा मागास महिला प्रवर्गाकरीता राखीव असून २० जागांपैकी १० भाजप, ३ काँग्रेस, ५ राष्ट्रवादी, २ शिवसेना असे बलाबल आहे. याठिकाणी गणेशपूर क्षेत्रातून निवडून आलेले भाजपच्या वर्षा साकुरे यांच्या नावाची चर्चा आहे. पवनी पंचायत समितीत सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरीता राखीव असून १४ जागांपैकी ७ काँग्रेस, ३ अपक्ष, २ भाजप तर शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यात मांगली क्षेत्रातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या अर्चना वैद्य सभापती तर राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवार खैरी येथील तोमेश्वर पंचभाई उपसभापती होण्याची चिन्हे आहेत.तुमसर पंचायत समितीत सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरीता राखीव असून २० जागांपैकी ९ भाजप, ७ राष्ट्रवादी, २ शिवसेना, काँग्रेस आणि अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यात येरली क्षेत्रातून विजयी झालेले भाजपच्या कविता बनकर या सभापती तर चिखला क्षेत्रातून निवडून आलेले शेखर कोतपल्लीवार हे उपसभापती होण्याची शक्यता आहे. मोहाडी पंचायत समितीत सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव असून १४ जागांपैकी ९ भाजप, २ राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. याठिकाणी करडी क्षेत्रातून विजयी झालेले भाजपचे विलास गोबाडे यांच्या नावावर मोहोर लागण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)