शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार कोण? एकच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:44 IST

लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. विविध मतदार संघात उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. मात्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्यापही केली नाही. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण या एकाच विषयावर सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर दररोज नवनवीन नावांचा शोध लावला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठळक मुद्देइच्छुकांचा जीव टांगणीला : सोशल मीडियावर नवनवीन नावांचा भडिमार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. विविध मतदार संघात उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. मात्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्यापही केली नाही. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण या एकाच विषयावर सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर दररोज नवनवीन नावांचा शोध लावला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला, तर युतीत भाजपाकडे आहे. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २५ मार्च आहे. मात्र त्यानंतर प्रचाराला अवघे १२ दिवस मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आधी उमेदवारी घोषित करून प्रचाराला जास्तीत जास्त वेळ मिळावा, अशी व्यवस्था करीत आहे. मात्र भंडारा-गोंदिया मतदार संघ त्याला अपवाद ठरत आहे. भाजप, राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षासह कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही.दोनही पक्षात अनेकजण इच्छूक आहेत. प्रत्येकांनी आपल्या पद्धतीने तिकीट मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही जण दिल्लीत तर काही जण मुंबईत तळ ठोकून आहेत. कुणीही ठामपणे आपल्याला उमेदवारी मिळेल हे सांगत नाही. परिणामी उमेदवार कोण याचीच चर्चा सर्वत्र दिसत आहे.सोशल मिडिया यात अग्रेसर आहे. व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकवर पोस्टचा महापूर आला आहे. प्रत्येकजण गणित लावून संबंधितालाच कशी उमेदवारी मिळणार हे सांगत आहे. दोन दिवसांपासून तर काही उमेदवारांची नावे व्हॉटअ‍ॅपवरून उमेदवारी निश्चित झाली म्हणून फिरत आहे. मात्र त्यात कोणताही अधिकृतपणा दिसत नाही. गावागावातील चर्चातही राजकारण हाच विषय असून कोणाला उमेदवारी मिळणार हे चविष्टपणे चर्र्चिले जात आहे.कोणता उमेदवार कसा प्रभावी राहील हे सांगत आहे. जातीचे गणित मांडून यालाच तिकीट मिळेल, असेही अनेकजण सांगत आहे. मात्र जोपर्यंत पक्ष अधिकृत उमेदवारांची घोषणा करत नाही तोपर्यंत अशा चर्चा मतदारसंघात व्हायरलच होणारच.उमेदवारीसाठी जातीय समीकरणभंडारा-गोंदिया मतदार संघात उमेदवारीसाठी जातीय समीकरणावर चर्चा होत आहे. या मतदार संघात कुणबी, पोवार, तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या समाजातून उमेदवारी कोणता पक्ष देणार यावरही सोशल मीडियात चर्चा होत आहे.नागपूरच्या निवडणुकीवर भंडाऱ्यात घमासानभंडारा जिल्ह्याचे असलेले काँग्रेसचे नेते नाना पटोले नागपूरमधून भाजपचे हेवीवेट उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे आहेत. नागपूर मतदार संघातील निवडणुकीची घमासान चर्चा भंडारा जिल्ह्यात होत आहे. नागपूरातून कोण विजयी होणार यावर आतापासूनच दावे-प्रतिदावे केले जात आहे. सोशल मिडिया तर यात आघाडीवर आहे.