पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षवाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासीलाखनी : काळीपिवळी ट्रॅक्स, खासगी बस, अँटो आदीसह विविध खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रवासी क्षमता ठरवून देण्यात आली आहे. मात्र तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, अड्याळ व पवनी या भागासह संपूर्ण जिल्ह्यात अनधिकृत व इतर खासगी वाहनांमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र या जीवघेण्या प्रवासाकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विनापरवाना तसेच कागदपत्र नसलेल्या दुचाकीधारकांवर कारवाई होत आहे. मात्र चारचाकी वाहनधारकांना अभय मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, गोंदिया व तिरोडा अशी सहा आगार आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व अंतर बघता या दोन्ही आगारात बसगाड्यांची कमतरता आहे. याशिवाय पुरेशा चालक-वाहकाअभावी आगाराच्यावतीने अनेकदा दुर्गम भागातील बसफेऱ्या बंद केल्या जातात. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला उधाण आले आहे. जुन्या भंगार झालेल्या टॅक्सीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबून खुलेआम वाहतूक केली जात आहे. आजपर्यंत अशा वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले असून कित्येक जणांना जीव गमवावा लागला आहे. मात्र जुन्या काळीपिवळी टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशी नकार देत नाहीत. धकाधकीच्या आधुनिक काळात कमी वेळेत अधिक कामे उरकून घेण्याच्या लगबगीत अनेक नागरिक जीवघेणा प्रवास करतात. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.(तालुका प्रतिनिधी)हा तर जीवघेणा प्रवास !जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात होणाऱ्या प्रवासी वाहतुकीत प्रत्येक वाहनात प्रवासी लटकलेले दिसून येतात. येथे गाडी भरण्याचे पॉइंट आहेत व यावर माणसांची नेमणूक केलेली असते. वाहन भरल्यानंतर त्याला प्रत्येकी वाहनाचे पैस ठरले असतात. वाहन प्रवाशी भरताना प्रवाशांचा जीवाची पर्वा न करता वाहन भरले जाते. भंडारा येथून पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर, मोहाडी, अड्याळ, जवाहरनगर या प्रमुख गावांसह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक चालते. यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहने जाताना आढळून येतात. या वाहनांच्या दारांना लॉक नाही. सिटांच्या जागेवर लाकडी बेंच बसविले आहेत. अनेक प्रवासी वाहनाबाहेर लटकलेले दिसतात.
जीवघेण्या प्रवासाला कुणाचे अभय?
By admin | Updated: June 16, 2015 00:41 IST