लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान कापणीला सुरुवात होत आहे. दरवर्षीच्या उन्हाळी धानाचा स्थिती पाहता यावर्षी पांढºया लोंबीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने धानाचे उत्पन्न अर्ध्यावर येण्याची शक्यता वाढली आहे.लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण राजाने प्रसन्नता दाखवित नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली होती. त्यामुळे भूजल साठ्यात एक ते दीड मीटरने वाढ झालेली जाणवली. याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी उन्हाळी धानात व भाजीपाला क्षेत्रात लागवड वाढवली आहे. १५ एप्रिलपर्यत वरुण राजाने अवकाळीच्या रूपाने हजेरी लावल्याने उन्हाळी धानाला पाणीटंचाई जाणवली नाही. भूजल जरी त्रासदायक ठरला नसला तरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण नियमित असल्याने खोडकिडीचा, पर्णकोष करपाचा त्रास अधिक झाल्याने आता निसव्यावरील पांढºया लोंबीचे प्रमाण सर्वाधिक जाणवत असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. सुरुवातीपासून रोग व किडीचा अभ्यास घेत कृषी विभाग व भात पैदाकार यांच्या सल्ल्यानुसार शेतकºयांनी अनेकदा फवारणी करण्यात आली. मात्र नियमित, अवकाळी व ढगाळ वातावरण असल्याने रोग व कीडीला पोषक वातावरण तयार झाल्याने पांढºया लोंबीचे प्रमाणात वाढ झाल्याचे अभ्यासकांकडून वर्तविण्यात आले आहे.शेतकºयांनी नियमित बांधानात उतरून कीडीचा व रोगाचा अभ्यास ठेवावा. वेळेत रोगाचे व किडीचे निदान झाल्यास त्यावर फवारणी निश्चितपणे केल्यास होणारे नुकसान टाळता येते. एका एकराला १८० ते २०० लीटर द्रावण फवारणी अत्यावश्यक आहे. बरेच शेतकरी अपेक्षित असलेला द्रावण फवारणी करीत नसल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढत जावून पिकाचे नुकसान होते.कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारसीनुसार फवारणी करणे अत्यावश्यक आहे.-गणपती पांडेगावकर,मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.
पांढऱ्या लोंबीने उन्हाळी धानाचे उत्पन्न घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST
लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण राजाने प्रसन्नता दाखवित नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली होती. त्यामुळे भूजल साठ्यात एक ते दीड मीटरने वाढ झालेली जाणवली.
पांढऱ्या लोंबीने उन्हाळी धानाचे उत्पन्न घटणार
ठळक मुद्देलाखनी तालुका: चारदा फवारणी करूनही नियंत्रण नाही, खरिपाच्या खरेदीने गोडाऊन फुल्ल