शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सोंड्याटोला ठरला पांढरा हत्ती

By admin | Updated: October 21, 2015 00:40 IST

सिहोरा परिसरातील शेती सिंचनाकरिता सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेमधील विघ्न टळता टळत नाही.

तुमसरात नियंत्रण गोंदियातून : हस्तांतरणाचे भिजत घोंगडे प्रकल्प मोहन भोयर तुमसरसिहोरा परिसरातील शेती सिंचनाकरिता सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेमधील विघ्न टळता टळत नाही. कायमस्वरुपी नियोजनाअभावी हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत आहे. जिथे पाणी तिथे नियोजन नाही व जिथे नियोजन केले जाते तिथे पाणी नाही अशी स्थिती आहे.सिहोरा-बपेरा परिसरात शेती सुजलाम सुफलाम करण्याकरिता बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली, परंतु ही योजना केवळ दोन ते तीन वर्षे सुरळीत सुरु होती. शेकडो हेक्टर सिंचनाची क्षमता या योजनेत आहे. शासन व प्रशासनाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाळ्यात बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर या अतिशय मोठ्या तलावात करण्यात येते. नंतर शेतीला हे पाणी सिंचनाकरिता देण्यात येते. सुमारे १२५ कोटी रुपये खर्च करुन ही योजना पुर्ण करण्यात आली, पंरतु नियोजनाचा अभाव येथे सुरुवातीपासूनच दिसून येत आहे.हस्तांतरण केव्हा होणार ?पाणी वितरणाची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाचे आहे. ही योजना विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या नियंत्रणात आहे. गोंदिया जिल्हयातील तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाची देखरेख आहे. प्रकल्प तुमसर तालुक्यात असून देखरेख व नियंत्रण सध्या गोंदिया जिल्ह्यातून करणे सुरु आहे. याकडे आतापर्यंत कुणाच लोकप्रतिनिधीकडे लक्ष गेले नाही ही शोकांतिका आहे.सध्या या प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ३४ लाख रुपयांचे वीज बील थकीत असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. एकीकडे तलावात पाणी आहे, पंरतु नियोजन नाही अशी परिस्थीती आहे. यासंदर्भात सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे उपविभागीय अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अन्य अधिकारी बोलायला तयार नाहीत. उंटावरुन शेळ्या हाकण्याचा हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस हा प्रकल्प भंगारात निघाल्याशिवाय राहणार नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे.