शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

अवैध वाहतुकीवर ‘वचक’ कुणाचा?

By admin | Updated: May 12, 2015 00:27 IST

१४ लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीचीही समस्या मोठ्या प्रमाणात फोफावली आहे.

भंडारा : १४ लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीचीही समस्या मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागात खुलेआम अवैध वाहतूक पाहायला मिळते. वाहनांच्या बाहेर लोंबकळणारे प्रवासी आपल्या जीवाची पर्वा करीत नाहीत. यावर वाहतूक शाखा नियंत्रण किंवा वचक बसविणार काय? असा सवाल आहे. भंडारा जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे. अशात लोकसंख्येच्या दृष्टीकोणातून प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यात एस.टी. च्या बसफेरीचा अभावामुळे अवैध वाहतूक फोफावली आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे व नियमबाह्य वाहन चालवित आहेत अशांविरुद्ध आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र परवाना नसलेले वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करीत आहेत. अशावेळी अपघातांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे. विशेषत: जिल्ह्यातून गेलेल्या पाचही राज्य मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ वाढले आहे. तीन सीटर असो की दहा सीटर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. नियमांना बगल देऊन ही कारवाई खुलेआम सुरु आहे. जिल्हा मुख्यालयात वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे सर्वच ठिकाणी सर्वच मार्गावर नियंत्रण ठेवणे आवाक्याबाहेर आहे. तरीही वर्षभरात वाहतूक शाखेमार्फत जनजागृती करून अपघातांवर आळा कसा बसेल यावर नियंत्रण केंद्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अपघातप्रवण स्थळी मार्गदर्शक सूचना, फलक व आवश्यक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टरची गरज आहे. काही ठिकाणी या सुविधा लावण्यातही आल्या आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या राज्य मार्गावरील वळणांवर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. मात्र नियमात वाहनचालविणाऱ्यांनाही विनाकारण गोवण्यात येत असल्याच्याही तक्रारीत वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईची धुम आहे. अशावेळी ट्रॅक्टर, ट्रक किंवा आॅटोमध्ये वऱ्हाड्यांची ने आण केली जाते. वळणांवर वाहन चालकांचे नियंत्रण गेल्याने अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. अशावेळी सावधगिरी बाळगणे महत्वाचे असतानाही व वेळोवेळी अपघातांच्या संख्येत वाढ होऊनही लोकांना त्यातून समज मिळालेली दिसत नाही. (प्रतिनिधी)१.६० लाखांचा दंड वसूलजिल्ह्यातील अवैध वाहतुकीला लगाम लावण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. भंडारा वाहतूक शाखेतर्फे गत दीड महिन्यात अवैधपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या ४८५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यातून १ लक्ष ६० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. - राजेंद्र तेंदुलकर, पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा भंडारा.