शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोअंतर्गत मजुरांना मेहनतीचे ३ कोटी ८१ लाख रुपये केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 14:09 IST

Bhandara : १५ हजार मजुरांचा समावेश रोजगार हमी योजना

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : गावातील मजुरांना गावातच किमान तीन महिने कामे उपलब्ध व्हावीत याकरिता केंद्र व राज्य शासन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत गावातच कामे उपलब्ध करून देते. त्या अकुशल मजुरांना मात्र निधीअभावी मजुरी मिळत नाही. तुमसर तालुक्यात रोहयोअंतर्गत सुमारे दोन महिने १५ हजार अकुशल मजुरांनी अकुशल कामे तालुक्यातील विविध गावांत केली. त्या मजुरांना ३० मेपर्यंतची मजुरी अजूनपर्यंत मिळालेली नाही. ही रक्कम ३ कोटी ८१ लाख २१ हजार २०४ रुपये इतकी आहे. तुमसर तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती असून बहुसंख्य ग्रामपंचायतींनी गावातील मजुरांना एमआरजीएसअंतर्गत अकुशल कामे उपलब्ध करून दिली. शासनाने येथे मागील दोन महिन्यांपासून अकुशल कामगारांना त्यांची मजुरी अजूनपर्यंत दिली नाही.

निधी उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात येते. हातावर आणून पानावर खाणे असा या मजुरांचा दिनक्रम असतो. त्यालाही निधी मिळत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. एवढे दिवस हे मजूर विनामजुरीने कशी कामे करतील, हे एक न उलगडणारे कोडे आहे.

३० मेपर्यंत या अकुशल मजुरांना शासनाकडून मजुरी देण्यात आली नाही. ग्रामपंचायतीमध्ये हे मजूर मजुरी केव्हा मिळेल याची विचारणा करीत आहेत. पंचायत समिती पदाधिकाऱ्यांकडेही मजुरीबाबत दररोज विचारणा केली जाते. शासनाकडून निधी मिळाला नसल्याने मजुरी खात्यावर जमा झाली नाही, हे एकच उत्तर त्यांना दिले जाते.

कुशल कामांचाही निधी थकीतकुशल कामेही तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यात ८४ लाख ९४ हजार ८७२ रुपये थकीत आहेत. यात लाभार्थ्यांची संख्याही मोठी आहे. आता पावसाळा सुरू झाला तरीसुद्धा अकुशल व कुशल कामांचे थकीत बिल शासनाने तत्काळ देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे तत्काळ लक्ष देऊन समस्या सोडवण्याची गरज आहे.

"तुमसर तालुक्यात अकुशल मजुरांची ३ कोटी ८१, तर कुशल कामांचे ८४ लाख ९४ हजार रुपये थकीत आहेत. येत्या आठ दिवसांत अकुशल मजुरांना त्यांची मजुरी त्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल."- हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती, तुमसर. 

टॅग्स :bhandara-acभंडाराgovernment schemeसरकारी योजना