शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर रोड अमृत भारत रेल्वे स्थानकाचा कायापालट कधी होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:49 IST

Bhandara : रेल्वे प्रशासनाचे मौन एकाच कंत्राटदाराला चार ते पाच रेल्वे स्थानकाचे काम

मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : रेल्वे मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर तुमसर रोड रेल्वे स्थानकाची निवड अमृत महाराज रेल्वेस्थानकात केली होती. मागील दीड वर्षापासून येथे कासवगतीने या रेल्वे स्थानकात कामे सुरू आहेत. एकाच कंत्राटदाराला चार ते पाच रेल्वे स्थानकाचे कामे अमृत भारत योजनेअंतर्गत मिळाली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कामांची गती येथे अगदी कमी आहे. त्याचा फटका सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना बसत आहे.

नागपूर विभागात तुमसर रोड रेल्वे जंक्शन हे क्रमांक तीनचे मोठे रेल्वे जंक्शन आहे. रेल्वे मंत्रालयाने तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या समावेश अमृत भारत रेल्वे स्थानकात केला आहे.या योजनेअंतर्गत हे रेल्वे स्टेशन कात टाकून अत्याधुनिक सोयीसुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहेत. परंतु, कामाची गती पाहता पुन्हा याला किमान आठ ते बारा महिने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

देशात पहिल्या टप्प्यात १३३७ रेल्वे स्थानकाच्या कायापालट होणार असून, अनेक रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्गीकरण झाले आहे. याकरिता रेल्वे मंत्रालयाने १२.३९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तुमसर रोड रेल्वे स्थानकात पार्किंग, तसेच आकर्षक प्रवेशद्वार व निकासी द्वार असे दोन द्वार राहणार असून, आधुनिक तिकीट काउंटर, प्रतीक्षालय, अत्याधुनिक शौचालय, दिव्यांगांकरिता वेगळे तिकीट काउंटर, सीसीटीव्ही कॅमेरे, हायमास्ट लाईट, आदींचा समावेश राहणार आहे. परिणामी बांधकामाला अजून वेळ लागेल. 

रेल्वे स्थानकाची कामे कासवगतीने तुमसर रोड रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयांना घेतला. या रेल्वे स्थानकातून किमान अडीच ते तीन हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. अमृत भारत रेल्वे स्थानकाचे काम निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे वेळेचे बंधन रेल्वे मंत्रालयाने घालून दिले होते. दीड वर्षानंतरही येथे कामे पूर्ण झाली नाही तर कामांची गती अतिशय मंद आहे. येथील काम करणारे कंत्राटदारांनी पुन्हा चार ते पाच रेल्वे स्थानकांची कामे घेतली असल्याची माहिती सूत्राने दिली.

सांस्कृतिक झलक विशेष आकर्षणभंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड हे महत्त्वपूर्ण रेल्वे जंक्शन असून, तुमसर हे तांदळाकरिता भारतात प्रसिद्ध आहे. येथे विशेष कलाकृतींचे रेल्वे स्थानकात आकर्षक राहणार असून, स्थानिक सांस्कृतिक झलक या रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर राहणार आहे. त्यामुळे तुमसर रेल्वे स्थानकाचे लुकच बदलणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :tumsar-acतुमसरbhandara-acभंडारा