शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण कधी काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:48 IST

डिसेंबर २०२५ मध्ये अधिसूचना निघणार : थेट निवडणुकीतून सरपंच पदाची निवड होणार

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा): सलग दहा वर्षांपासून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीतून दूर असलेल्या तुमसर तालुक्यातील १८ गट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना डिसेंबर २०२५ मध्ये निघणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सरपंच व सदस्य पदाची निवडणूक होणार आहे. या गट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला फक्त वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्याची मागणी सुरू झाली आहे. सरपंच पदाचे आरक्षण माहीत होणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायती आहेत. यात १८ गट ग्रामपंचायत असून सार्वत्रिक निवडणुका २०२१ वर्षात जानेवारी महिन्याचे पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना डिसेंबर महिन्यात काढण्यात येत आहे. यामुळे गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीला फक्त १ वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. गट ग्रामपंचायतीला सलग दहा वर्षापासून थेट सरपंच पदाची निवडणूक प्राप्त झाली नाही. सरपंच पद सदस्यामधून निवड करण्यात आले आहे. 

सरपंच पदाचे आरक्षण निवडणूक आटोपल्यानंतर काढले जात आहे. गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण काढताना तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्यात येत आहे. यामुळे ८९ ग्रामपंचायत गावात अडीच वर्षापूर्वीच सरपंच पदाचे आरक्षण माहीत होत आहे. परंतु अशी स्थिती गट ग्रामपंचायतच्या गावात माहिती होत नाही. यामुळे निवडणुकीच्या काळात गावातील नागरिकांमध्ये साशंकता निर्माण होत आहे. 

८९ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण सन २०२१ मध्ये घोषित करण्यात आले होते. परंतु ही संधी गट ग्रामपंचायतच्या गावांना कधी मिळाली नाही. १ वर्ष ग्रामपंचायत निवडणुकीला शिल्लक असल्याने सरपंच पदाचे आरक्षण गट ग्रामपंचायतच्या गावात घोषित करण्याची ओरड गावातील नागरिकांनी सुरू केली आहे. 

थेट निवडणुकीने गावात उत्सुकतागट ग्रामपंचायतला थेट सरपंच पद निवडणूक मिळाली नाही. अन्य गावांना मिळाली आहे. सरकार बदलले म्हणजे सरपंच पद निवडणुकीचे निर्णय बदलत गेले आहेत. यामुळे थेट सरपंच पद निवडणुकीत गट ग्रामपंचायत दूर गेल्या आहेत. आता या गावांना थेट सरपंच पदाचे निवडणुकीची संधी मिळणार असल्याने गावात उत्सुकता वाढली आहे. आता सरपंच पदाच्या आरक्षणाकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbhandara-acभंडारा