शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

ग्रामीण भागात शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:42 IST

बारव्हा : कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून ...

बारव्हा : कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. काहींचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. मात्र गरिबांच्या मुलांना ही सुविधाही मिळाली नाही. घरी राहून विद्यार्थ्यांसह पालक वैतागले आहेत. आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय कधी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत. त्यानंतर जून-२०२१ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. परंतु शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या नाहीत. जुलैमध्ये शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच १७ ऑगस्टपासून इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. टास्क फोर्सच्या इशाऱ्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यातच दिवाळीनंतर या शाळा सुरू होण्याचे संकेत राज्य शासनाने दिले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर लग्न, हॉटेल, बार, दुकाने, मॉल, बस, रेल्वे यासह इतर बाबींना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचा आरोप काही शिक्षणतज्ज्ज्ञांनी केला आहे. प्रशासन व तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. टास्क फोर्समधील तज्ज्ञांचा शाळा सुरू करण्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

बॉक्स

बालमनावर विपरीत परिणाम

शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकर ठोस निर्णय घेत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा नसल्याने ऑनलाईनच्या नावावर शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये शालेय विद्याथ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती काही शिक्षकांनी दिली असून, याला पालकांसह डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. मुलांच्या वर्तनात बदल जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षणातील रुची कमी

मुले घरी असल्याने ती पालकांसोबत रोज गर्दीत जात आहेत. काही शेतातील कामे करतात तर काही गटागटाने खेळत असतात. यात त्यांना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य उपाययोजनांचे भान नसते. त्यांचा संपूर्ण वेळ खेळण्यात जात असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांची शिक्षणातील रुची कमी होत असल्याचेही पालकांनी सांगितले, याबाबत शिक्षकांच्या संघटना आक्रमक भूमिका न घेता गप्प असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.

कोट

कोरोना संक्रमण कमी झाले की निर्बंध उठविले जातात. वाढले की करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण पुन्हा लावले जातात. हाच निकष शाळेला लावून शाळा सुरू कराव्यात.

- महादेव खटके, शिक्षक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारव्हा.

शाळा बंद असल्याने मुले आमच्यासोबत लान, बारसे, बाजार, इतर घरगुती कार्यक्रमात येतात. आम्ही दिवसभर शेतात असतो, तेव्हा मुले घोळक्याने गावात खेळतात. शाळा सुरू झाल्या तर ते शाळेत सुरक्षित राहतील व शिक्षणही होईल. त्यामुळे सरकारने लवकर शाळा सुरू कराव्यात.

रवी झोडे, पालक