शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

चकारा तीर्थस्थळाचा विकास कधी होणार ?

By admin | Updated: May 19, 2017 01:00 IST

ऐतिहासिक परंपरा लाभलेला तालुक्यात अनेक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे आहेत मात्र आजही लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे ही ठिकाणे ओस पडली आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : निधीची वानवा कायम विशाल रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क अड्याळ : ऐतिहासिक परंपरा लाभलेला तालुक्यात अनेक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे आहेत मात्र आजही लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे ही ठिकाणे ओस पडली आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील चकारा येथील ऐतिहासिक महादेवाचे मंदिर, नैसर्गिक पर्यटनस्थळ अद्यापही विकसित झालेले नाही. इतिहासाची साक्ष देणारे हे स्थळ उपेक्षित आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असला तरी नैसर्गिक वनस्पती आणि ऐतिहासिक वास्तू विखुरल्या आहेत. चकारा गाव हे ७०० लोकवस्तीच्या वास्तव्याच्या गावाच्या दक्षिणेला निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून मालगुजारी तलाव आहे. तलावाच्या पश्चिमेला टेकड्या आहेत. टेकडीवर विक्तुबाबाच्या विहाराची स्थापना केली आहे. तलावाजवळच असलेल्या महादेवाच्या मंदिराची स्थापना केली आहे. तलावाजवळच असलेल्या महादेवाच्या मंदिराची स्थापना १८५० मध्ये लिंग्यामल्ला पाटील यांचे पुत्र आबाजी व बाबाजी या बंधूनी केली असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर वैनगंगेच्या तीरावर वसलेले असून येथील मुर्ती प्राचीन आहे. नक्षीकाम दगडावर कोरलेले आहे. येथे हनुमान, श्री बालाजी देवस्थान, श्री गणेश, नवदुर्गा आदी देवतांचे वस्तीस्थान आहे. अड्याळ तिर्थक्षेत्राला लागुनच असल्याने येथे विदर्भ मध्यप्रदेश छत्तीसगढ येथून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथील नक्षीकाम खजुराहो येथील कलेशी मिळतेजुळते आहे. परंतु येथे भाविक व पर्यटकांसाठी योग्य सुविधा नाही. परिसरातील झुडपी जंगलाचा हिरवागार शालु नेसल्यासारखी सृष्टी हिरवळीने नटून जाते. ही सृष्टी पर्यटकांचे व भाविकांचे लक्ष वेधून घेते. ग्राम चकारा हे गाव म्हणजे आजचे अड्याळ. अख्खा महाराष्ट्रात येथील घोडायात्रा प्रसिध्द असली तरी तिचा उगमही चकारा येथून झाला ते असे चकारा या वस्तीवर ३०० वर्षापूर्वी कॉलरा या आजाराची वक्रदृष्टी झाल्याने येथील लोकांनी चकारा शेजारील अड्याळ टेकडी येथे स्थलांतरण केले. अड्याळ गावाची निर्मिती झाली. मात्र त्यांची कुलदैवता व मंदिरे चकारा येथेच असल्याने सदर मंदिरातून काढून रामनवमी ते हनूमान जयंतीपर्यंत नऊ दिवस यात्रा भरत असे. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. कालांतराने चकारा येथून निघणारा घोडायात्रा रथ हा १०० ते १२० वर्षापूर्वी बंद करण्यात आल्याचे मंदिराचे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी सांगितले. ऐतिहासिक दगडावरील नक्षीकामे, कोरलेली लेणी आजही ऐतिहासिक पुरावा देत आहे. याठिकाणी शासनाने दिलेले सभामंडप, बोअर केलेले हातपंप, मंदिराच्या मागेच तलाव व तलावाच्या चारही बाजुंनी वेढलेल्या टेकड्या व तलावाच्या पोटातून नागमोडी मार्गाने जाणारा रस्ता पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. शासनाने सदर पर्यटन स्थळाला क दर्जा दिलेल असला तरी मात्र कमेटीतील काही लोकाच्या शेतजमिनी असल्याने सदर प्रस्तावाला केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे बोलले जाते. या स्थळाजवळच लागुन असलेले नेरला डोंगर महादेव, भिवखिडकी जलाशय, अड्याळ येथील जागृत हनुमानाचे तिर्थस्थळ व येथूनच काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय गोसे प्रकल्प असल्यामुळे सदर विकास झाल्यास आणखीनच भर पडेल व बेरोजगारांना लघु व्यवसायासाठी चालना मिळू शकेल. चकारा पर्यटन स्थळ म्हणून त्वरित विकसीत करुन सोयीसुविधा पुरविण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र हजारे, राजेंद्र ब्राम्हणकर, चंदु कोडापे, अतुल मुलकलवार, प्रकाश मानापूरे, कमलेश जाधव, राजु रोहणकर, राहुल फटीक, सारंग मुलकलवार, कलीम शेख, समीर एनपेड्डीवार, निरंजन देवईकर व परिसरातील पर्यटनप्रेमींनी केली आहे.