आमगाववासीयांचा सवाल : महामंडळाला बियाणे देणे पडले महागातआमगाव (दिघोरी) : धानाला योग्य प्रकारे भाव मिळावा म्हणून आमगाव येथील शेतकऱ्यांनी राज्य बियाणे महामंडळाला दिलेल्या धानाला अजूनपर्यंत बोनस मिळाला नाही. येथील शेतकरी बोनस पासून वंचित राहले आहे. महामंडळाला धान्य देणे शेतकऱ्याला महागात पडले आहे.बियाणे तयार करण्यासाठी महामंडळ शेतकऱ्यांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने धानाची खरेदी करते. आमगाव येथील गोपळ चौधरी, घनश्याम चेटुले, देवानंद चौधरी, घनश्याम भांडारकर यांनी महामंडळाला यावर्षी धान्य दिले. महामंडळ धान्य साफ करून उरलेला कमी प्रतीचे धान शेतकऱ्यांना परत करते. शेतकऱ्यांकडून सरसकट धान्य घेतल्या जात नाही. यावर्षी धानाची उत्पन्न कमी झाले असल्याने शासनाचे धानाला बोनस जाहीर केले. धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केली त्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस देण्यात आला. मात्र महामंडळाला दिलेल्या धानाला अजूनपर्यंत बोनस मिळाला नाही.याआधी महामंडळाने सुद्धा शासनाने जाहीर केलेला बोनस शेतकऱ्यांना वितरीत केला होता. शासनाने धानाला उशिरा बोनस जाहीर केल्याने शेतकऱ्यांना महामंडळाकडून बोनस वितरण झाला नाही. शेतकऱ्यांची बोनसची मागणी आहे असा अहवाल महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना बोनस मिळणार तरी कधी?
By admin | Updated: October 20, 2015 00:46 IST