शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार तरी कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:01 IST

पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष : तपासणी होणे अत्यंत गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूलबस व स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिस विभाग व शिक्षण विभाग यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रायोगिक स्तरावर ' सीबीएसई' च्या काही शाळांमधील बसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाली; परंतु आजही जवळपास अर्ध्या स्कूल बसमध्ये ही यंत्रणाच नसल्याचे वास्तव आहे.

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नव्या उपाययोजना जाहीर केल्या. एका महिन्यात सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले, अन्यथा अनुदान रोखण्यासह शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा सरकारने दिला.

या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्कूलबस व स्कूल व्हॅनमधील सीसीटीव्ही बसविण्याची मागणी पालकांकडून होऊ घातली आहे. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा या उद्देशातून स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस प्रणाली बंधनकारक करण्यात यावी आणि ही उपकरणे कायम चालू स्थितीत असावीत, सीसीटीव्ही कॅमेरेमुळे पालकांच्या मोबाइलवर बसच्या आतील चित्रीकरण व फोटो दिसणे शक्य होईल बसमधील व्हिडीओ ऑफलाइन पाहू शकतील.

शिवाय, जीपीएस प्रणालीमुळे स्कूलबस नेमकी कुठे आहे, तिचा वेग किती आहे याची माहिती मिळणेही शक्य होणार असल्याने अनुचित प्रकाराला आळा बसेल. याच दरम्यान झालेल्या बैठकीत तातडीने ही यंत्रणा सर्व बसमध्ये लावण्याच्या सूचना दिल्या; परंतु मोजक्याच सीबीएसई शाळांच्या बसेसमध्ये ही यंत्रणा लागली. नंतर हा विषय दुर्लक्षितच राहिला. पालकांनी कोणाच्या विश्वासावर मुले सोपवायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ऑटो आणि व्हॅनमध्ये कॅमेरेच नाहीत साकोली येथे शाळा व कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या ऑटो व व्यायाम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत ही वाहने दररोज पोलिसांच्या समोरून विद्यार्थ्यांची ने-आण करतात मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा