शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

प्रकल्पग्रस्तांच्या वेदना संपणार तरी केव्हा?

By admin | Updated: April 22, 2017 00:35 IST

राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द (इंदिरासागर) धरणाचे काम पुर्णत्वाला आले असले तरी उजवा व डावा

पुनर्वसन हाच मुख्य अडसर : आता ‘एनबीसीसी’ करणार उजवा कालवा व नेरला उपसा सिंचन योजनेचे काम नंदू परसावार  भंडारा राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द (इंदिरासागर) धरणाचे काम पुर्णत्वाला आले असले तरी उजवा व डावा कालवा दुरूस्तीची कामे, उपसा सिंचन योजनेची कामे आजही अपूर्णावस्थेत आहेत. शेतकऱ्यांना सुजलाम्-सुफलाम् करण्याचे स्वप्न दाखवून १९८८ मध्ये पायाभरणी करण्यात आलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाला शनिवारला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. या २९ वर्षात धरणाची उंची वाढली, विस्तार वाढला आणि किंमतही ५० पटीने वाढली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या वेदना आजही कायम आहेत. २२ एप्रिल १९८८ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्याहस्ते पायाभरणी झालेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत ३७२.८५ कोटी इतकी होती. तिसऱ्या सुधारीत दरसूचीनुसार या प्रकल्पाची किंमत १८,४९४.५७ इतकी वाढली आहे. मार्च २०१७ पर्यंत ९,३००.५८ कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. इतका खर्च होऊन केवळ ४९ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली. मागीलवर्षीचे ७२० आणि यावर्षीचे ७५० असे १,४७० कोटी रूपयांचे यावर्षीचे बजेट आहे. आता या प्रकल्पाचे काम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. २००९ मध्ये गोसेखुर्द प्रकल्पाला तत्कालीन केंद्र सरकारने ‘एआयबीपी’ (एक्सिलेरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम) अंतर्गत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली. त्यानुसार या प्रकल्पाला केंद्राकडून ९० टक्के तर राज्याकडून १० टक्के अर्थसहाय्य देण्याचे ठरविण्यात आले होते. या धरणाचे पाणी शेतापर्यंत पोहचविण्यासाठी उजवा व डावा असे दोन्ही मुख्य कालवे बांधण्यात आले आहे. या कालव्यापासून तयार करण्यात आलेले लघु कालवे व वितरिकांचे कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत. डावा कालव्यातंर्गत ३१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून मागीलवर्षी ६,६८० हेक्टर क्षेत्र सिंचित झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. या प्रकल्पाच्या बुडीतक्षेत्रात ३४ गावे पूर्णत: तर ७० गावे अंशत: बाधित झाले आहेत. पूर्णत: बाधित ३४ गावांपैकी २८ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. यापैकी नेरला, खापरी (रेहपाडे), भंडारा (नझुल), सालेबर्डी, पिंडकेपार आणि करचखेडा या गावांचे पुनर्वसनाचे काम शिल्लक आहे. त्यापैकी सालेबर्डी, पिंडकेपार आणि करचखेडा या गावासाठी भूसंपादन करण्यात आले असून ले-आऊट मंजूर झाल्याचे कार्यकारी अभियंता अनिल खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भंडारा जिल्ह्याच्या सिमेपर्यंत ३० कि़मी.चा उजवा कालवा तयार आहे. परंतु कालव्याचे पाणी शेतापर्यंत जाण्यासाठी बांधलेले लघू कालवे व वितरिका अपूर्णावस्थेत असून सदोष बांधकामाचा फटका शेतकऱ्यांना बसला. नेरला उपसा सिंचन योजनेचे काम आॅगस्ट २०१६ मध्ये सुरू झाले असून ऊर्वरित कामे तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मागीलवर्षी ३,५०० हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले असले तरी शाश्वत सिंचनाचा लाभ मात्र शेतकऱ्यांना झालेला नाही.