शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

आले कधी? गेले कधी?

By admin | Updated: August 15, 2015 01:01 IST

मागच्या सरकारनं कर्ज करुन ठेवलं, मागच्या सरकारनं भ्रष्टाचार केलं, मागच्या सरकारनं अमकं केलं, मागच्या सरकारनं तमकं केल, म्हणूनच तर जनतेने दुसर लग्न केलं असा मध्यंतरी वॉटसअ‍ॅपवर संदेश फिरला.

मागच्या सरकारनं कर्ज करुन ठेवलं, मागच्या सरकारनं भ्रष्टाचार केलं, मागच्या सरकारनं अमकं केलं, मागच्या सरकारनं तमकं केल, म्हणूनच तर जनतेने दुसर लग्न केलं असा मध्यंतरी वॉटसअ‍ॅपवर संदेश फिरला. या संदेशात बऱ्याचअंशी तथ्य होत. त्यांनी काही केलं नाही म्हणून तुम्हाला संधी दिली असा त्याचा अर्थ होत असला तरी सरकार कोणतेही येवो परिस्थती मात्र सारखीच असते, याचा प्रत्यय भंडारा जिल्हावासियांना कायम येत आहे. वर्षभरापूर्वी आघाडीचे सरकार होते आता युतीचे सरकार आहे. माणसे बदलली तेवढी परिस्थिती मात्र ‘जैसे थे’च आहे. त्यावेळेचे पालकमंत्री आणि आताचे पालकमंत्री यांना ही जबाबदारी जबरदस्तीने लादली तर नसावी ना, असे म्हणने अतिशयोक्तीचे ठरणार नाही. पालकमंत्रीपद हे बिरूद नाही. शाश्वत विकासासाठी, जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी, त्यातून समस्या सोडविण्यासाठी एकूणच सरकारवरचा ताण कमी व्हावा यासाठी ही जबाबदारी सोपविण्यात येत असते. मात्र अलिकडच्या काळात पालकत्वाची जबाबदारी पालकमंत्री विसरल्यागत झाले आहे. युती सरकारने सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले दीपक सावंत यांच्यावर भंडारा जिल्ह्याची जबाबदारी सोपविली. पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ.सावंत यांच्याकडून खूप अपेक्षा असल्या तरी त्यांच्या आरोग्य खात्यामार्फत येणारी महिला रूग्णालयाची समस्या ही त्यातली महत्त्वाची समस्या आहे.भंडारा शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय मंजूर होऊन अडीच वर्षाचा काळ लोटला आहे. परंतु रूग्णालयाला जागा मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी प्रविण उदापुरे या तरुणाने उपोषण केले. पाच दिवसानंतर आरोग्यमंत्र्यांनी उपोषण सोडविले. जागा शोधण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून १५ आॅगस्टला स्वत: भूमिपूजन करणार असे अभिवचन देऊन ते परतले. परंतु प्रशासनाला आतापर्यंत जागा सापडलेली नाही. काय गरज होती उदापुरे या तरुण कार्यकर्त्याला उपोषण करण्याची, त्यांच्या घरचेच केवळ या रूग्णालयात जाणार आहेत कां? परंतु समाजासाठी देणे असल्याच्या भावनेतून हा तरुण महिला रूग्णालय व्हावे, यासाठी धडपडत आहे. गरिबांसाठी रूग्णालय व्हावे यासाठी कुणी समोर येत नाही यासाठी त्याने उपोषण केले. मात्र निगरगट्ट शासन - प्रशासनाला त्याची हाक एैकू आली नाही. आली असली तरी त्यावर अंमलवजावणी मात्र झाली नाही. भंडारा जिल्ह्यात महिला व गर्भवती मातांचा प्रश्न बिकट असून दोन वर्षात सामान्य रुग्णालयात १० महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला याचा अर्थ असा की वर्षात पाच तर तीन महिन्यात दोन महिलांना प्राण गमवावे लागते, जर हे प्रमाण आहे तर सरकारला आता जाग आली पाहिजे. ४०० खाटांच्या सामान्य रुग्णालयात २०० च्यावर खाटा प्रसुती व महिला रुग्णांसाठी वापरण्यात येतात. सामान्य रूग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेचे प्रमाण ५ ते १५ टक्के मापदंड असताना ४३ ते ४८ टक्के सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात येतात, ही निश्चितच आश्चर्याची बाब आहे. २०१३-१४ मध्ये ७,३८४ प्रसुतीपैकी ३,२२४ सिझेरीयन प्रसुती झाल्या. २०१४-१५ मध्ये ८,०८० प्रसुतीपैकी ३,६२४ म्हणजे ४४.८१ टक्के प्रसुती सिझेरीयन झाल्या आहेत. सामान्य रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या २५ जागा तर परिचारिकांसह ४४ जागा रिक्त आहेत. सामान्य रूग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या ७५ ते ८० टक्के महिला रुग्णांमध्ये रक्ताची कमी या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यातच कोट्यवधीचे सीटी स्कॅन युनिट व अत्याधुनिक उपकरणे असूनही डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना हाल सोसावे लागत आहे, ही शोकांतिका नाही तर काय?तत्कालीन पालकमंत्री रणजित कांबळे यांना झेंडा टू झेंडा मंत्री असे म्हणायचे. त्यामुळे ते केवळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला येणे पसंद करायचे. सोयीनुसार येणार आणि सोयीनुसार जाणार असा त्यांचा दौरा असायचा. आताचे पालकमंत्री डॉ.सावंत हे शुक्रवारला सायंकाळी नवनिर्मित वास्तुच्या उद्घाटनासाठी सामान्य रूग्णालयात आले आणि उद्घाटन आटोपून परतले. मुक्कामासाठी भंडारा हे कदाचित सोयीचे ठिकाण नसणार म्हणून ते नागपूरला मुक्कामी गेले. पालकत्व स्वीकारल्यानंतर उद्या पाचव्यांदा त्यांची भंडारा भेट राहणार असली तरी त्यांचा शासकीय दौरा ७.४५ ते ११.१५ असा म्हणजे केवळ साडेतीन तासांचा राहणार आहे. त्यामुळे या साडेतीन तासात जितक्या समस्या सुटतील, तेवढ्या ते सोडवतील आणि परत जातील. पालकमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या भेटीत त्यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला. त्यावेळी पक्ष संघटन वाढवा, मी तुमच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही दिली. त्यामुळे शिवसैनिकांना जोश आला होता. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीत ते एकदाही फिरकले नाहीत. पालकमंत्रीपद असल्यामुळे चार जागा जिंकण्यासाठी पदाचा लाभ झाला असता, अशा शिवसैनिकांच्या भावना होत्या. मात्र त्याही फोल ठरल्या. शनिवारच्या साडेतीन तासांच्या शासकीय दौऱ्यात ते किमान महिला रुग्णालयाच्या जमिनीचा तिढा सोडवतील, अशी अपेक्षा करु या...