शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

विहिरीत पडला बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:19 IST

सासरा येथील शेतशिवारतील विहिरीत बिबट पडला. विहिरीत बिबट असल्याची माहिती गावात व परिसरात पसरताच आबालवृद्धांचे जत्थे घटनास्थळाकडे जात होते.

ठळक मुद्देसासरा येथील घटना : सुखरूप काढले बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली/ सासरा : सासरा येथील शेतशिवारतील विहिरीत बिबट पडला. विहिरीत बिबट असल्याची माहिती गावात व परिसरात पसरताच आबालवृद्धांचे जत्थे घटनास्थळाकडे जात होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी हजारोंच्या संख्येत असलेल्या जनसमुदायाला घटनास्थळापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना रविवारी घडली.शेतमालक प्रमोद संग्रामे, सरपंच शालीक खर्डेकर, माजी सरपंच योगराज गोटेफोडे, तंमुस अध्यक्ष तुकाराम गोटेफोडे, रोशन संग्रामे, सोनु संग्रामे यांनी सदर घटनेची माहिती वनविभाग कार्यालय व सानगडी येथील पोलीस चौकीला दिली.घटनास्थळावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून क्षणाचाही विलंब न लावता पोलीस व वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.प्रत्यक्षात परिस्थिती पाहता या घटनेची माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात दिली. काही वेळेतच वनविभागाचे व पोलीस विभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.शनिवारच्या रात्री कुंजीलाल संग्रामे, रोशन संग्रामे, सोनु संग्रामे, अजय संग्रामे हे शेतकरी ऊसाला पाणी देण्याकरिता शेतावर गेले. यांच्यापैकी कुंजीलाल यांना बिबट दिसला. त्यांनी याची माहिती सहकाऱ्यांना दिली. ती वेळ साधारणत: रात्रीच्या ९ वाजताची होती.या शेतकºयांनी मोबाईलद्वारे घरी व मित्रांना सानगडी येथील वनविभागाला माहिती दिली. काही क्षणात वनविभागाचे कर्मचारी व गावातील शेकडो नागरीक शेताकडे आली. आजुबाजूला शोधताच दोन बिबट त्यांच्या दृष्टीस पडले. या वाघांनी माकडाची शिकार केली होती. ती शिकार खात असतांनीच लोकांचा आरडाओरड झाला. विहिरीच्या आजूबाजूच्या शेतात ऊसाचे पिक उभे आहे. लोकांच्या गलक्याने वाध पळत असतानीच एक वाघ विहिरीत पडला असावा ही बाब त्यावेळी कोणाच्याही लक्षात आली नाही.शेतकरी सकाळी शेतात गेले. त्यांच्यासोबत अन्य मंडळी होती. सर्वत्र ऊस असल्याने इशारा करुन खात्री करत होते. त्यांना एक बिबट ऊसात आढळला. त्याला ते हाकलत होते. काही मंडळी विहिरीच्या दिशेने जात होती. त्यापैकी एकाने विहीरीत डोकावून पाहताच त्याना तिथे बिबट दिसला. ही माहिती सर्वत्र पसरली. बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.घटनास्थळी वन परिक्षेत्राधिकारी आरती ऊके, आर. ओ. घोटे, तांडेकर, मेश्राम, सार्वे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पोलीस मेश्राम, गायधने यांनी सहकार्य केले.