निर्णय लवकरच : बाळा काशीवार यांना ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन लाखांदूर : लाखांदूर तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांत मारामारी सुरु झाल्या आहे. आमदार बाळा काशिवार यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेशी चर्चा करून लोडशेडिंग चार तासाने कमी करण्यासंदर्भाचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे सांगितले आहे.यावर्षी अत्यल्प पावसाचे प्रमाण असताना तालुक्यातील शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. परंतु आता पावसाची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवली. या परिस्थितीत गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातून चौरास भागात पिकासाठी पाणी सोडण्यात आले. उपकालव्याचे बांधकाम अर्धवट असल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. ही बाब शेतकऱ्यांनी आमदार बाळा काशीवार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी चौरास भागातील कालव्याची पाहणी केली असता भारनियमन व इतर बाबी गंभीर असल्याचे त्यांचे निदशर्नास आले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान पीक पाण्यावाचून मारत असून भारनियमनच्या वेळात थोडा बदल करून पुन्हा लोडशेडिंग चार तासाने कमी करण्यासंदर्भात तसेच कॅनालवर लावलेले पंपकरिता विद्युत विभागाने लादलेले जास्तीचे डिमांड व थकीत शेतकऱ्याचे विद्युत कनेक्शन खंडित करण्यासंदर्भात विद्युत विभागाने घेतलेला निर्णय थांबवावा यासाठी चर्चा केली. शेतकऱ्यांचे हित पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून लवकरच चार तासाने लोडशेडिंग कमी, डिमांडची रक्कम कमी व उत्पादन निघेपर्यंत विद्युत कनेक्शन खंडित न करण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
भारनियमन पुन्हा चार तासाने कमी होणार
By admin | Updated: September 1, 2016 00:48 IST