शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकी युगात घोडाबाजार लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:05 IST

दुर्गाबाई डोह यात्रेवर यावर्षी घोडाबाजार भरलाच नाही. या यांत्रिकी युगामध्ये येथील घोडाबाजार लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. दुर्गाबाई डोह यात्रेवर यापुर्वी बालाघाट, शिवनी, अकोला, अमरावती व इतर ठिकाणाहून येथे घोडे खरेदी-विक्री करिता येत होते.

ठळक मुद्देउरल्या केवळ आठवणी : कुंभली येथील दुर्गाबाई डोह यात्रा, दरवाढीचा फटका कारणीभूत

शिवशंकर बावनकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : दुर्गाबाई डोह यात्रेवर यावर्षी घोडाबाजार भरलाच नाही. या यांत्रिकी युगामध्ये येथील घोडाबाजार लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.दुर्गाबाई डोह यात्रेवर यापुर्वी बालाघाट, शिवनी, अकोला, अमरावती व इतर ठिकाणाहून येथे घोडे खरेदी-विक्री करिता येत होते. पन्नास-साठ वर्षापूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होते. त्यावेळेस पाटील, मालगुजार व संपन्न लोक साधन व शौक म्हणून घरी घोडे ठेवत होते. घोड्याच्या देखभालीकरिता मजुरी सुद्धा मिळत होती. या यांत्रिकी युगामध्ये आवागमनची साधने खेड्यापासून ते तालुका मुख्यालयापर्यंत झाली आहेत. घोडे सुद्धा मोटरसायकल ते कारच्या किंमती पर्यंत पोहचली आहेत. जेवढा घोडा किंमती त्याप्रमाणात देखभाल करावी लागते. सध्या गावात मजुर मिळत नाही. घोड्याचा देखभाल करण्याचा खर्च सुद्धा परवडणारा नाही. यामध्ये दैनंदिन खुराग, गवत दररोज धुणे हे सुद्धा सर्व खर्चिक झालेले आहे.दुर्गाबाई डोह यात्रा विदर्भ, छत्तीसगढ व मध्यप्रदेशातील काही जिल्हे शिवनी, बालाघाट व छिंदवाडा जिल्ह्यात प्रसिद्ध यात्रा आहे. यात्रेमध्ये विविध घरोपयोगीची १२०० ते १५०० दुकाने लावली जातात. ज्या वस्तु बाहेर मिळत नाहीत त्या घरोपयोगी वस्तु येथे मिळतात. पन्नास ते साठ हजारापर्यंत भाविकाची ये-जा असते. या यात्रेमध्ये कोट्यावधीची उलाढाल होते. ही यात्रा चार दिवसपर्यंत चालते. त्यामुळे एकेकाळी पाटील घोडा बाजार-खरेदी विक्री करिता प्रसिद्ध होता.मागील वर्षी दोन घोडे आले होते. त्याचा कोणी खरीददार न मिळाल्यामुळे ते परत गेले. यावर्षी मात्र येथील घोडा बाजारात खरेदी-विक्री करिता घोडे आलेच नाही. येथील घोडा बाजार या यांत्रिकी युगामध्ये लोप होण्याच्या मार्गावर आहे.