शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यात किडीने धान पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

तुमसर तालुका हा धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु सध्या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम धान पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. सध्या येथील धान पिकावर गाद, मावा, तूड तुडा या किडीने धान पिकावर आक्रमण केले आहे. परिणामी धान पिकला मोठा धोका निर्माण झाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम पिकांचे मोठे नुकसान केले असून धानावर मावा, तुड तुडा करपा, गाद इत्यादी किडीने धान पीक फस्त करणे सुरू आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन हजाराचे औषध फवारणी करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा व आर्थिक मदतीची मागणी पं. स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्र्याकडे केली आहे.तुमसर तालुका हा धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु सध्या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम धान पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. सध्या येथील धान पिकावर गाद, मावा, तूड तुडा या किडीने धान पिकावर आक्रमण केले आहे. परिणामी धान पिकला मोठा धोका निर्माण झाला आहे. धान पिवळसर झाली असून किडीच्या आक्रमणामुळे संपूर्ण धान उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतकरी धान पीक बसावा याकरिता एक री  दोन ते तीन हजार रुपये औषध फवारणी वर खर्च करीत आहे. त्यानंतरही धान पीक वाचेल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी सध्या बांधावर भेट देत आहेत. या परिसरात कृषी सहाय्यक एच.एन. पडारे, मंडळ कृषी अधिकारी ए.एस.बागडे यांनी शेतातील धाणाची पाहणी केली. सुरुवातीला तुमसर तालुक्यात पावसाने दगा दिला होता. त्यानंतर परतीच्या पावसाने झोडपून काढले. सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे धान पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीचे प्रमाण कमी होत नाही या विवंचनेने मध्ये येथील शेतकरी आहे. हाती आलेले पीक जाईल काय अशी चिंता त्यांना सतावत आहे. काही परिसरामध्ये किडीने धान उद्ध्वस्त केले असल्यामुळे त्या धानाचा सध्या तनस झाला आहे. कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य माजी सभापती कलाम शेख, बाजार समिती संचालक बालकदास ठवकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल वराडे, माजी सरपंच विजय चौधरी, सरपंच गडी राम बांडेबुचे यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती