शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:20 IST

जल जीवन आहे. पाण्याचे महत्व अनन्यसाधारण असताना तुमसर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनी लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

ठळक मुद्देशेकडो लिटर पाणी व्यर्थ : जलवाहिनी लीकेज, वृक्षांचे कठडे व घंटागाड्या पडून

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जल जीवन आहे. पाण्याचे महत्व अनन्यसाधारण असताना तुमसर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनी लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. जलशुद्धीकरण परिसरात पाणी साचले आहे. साचल्या पाण्यात वृक्षांची कठडे, कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या पडून आहेत. नवीन लोखंडी साहित्य मागील अनेक महिन्यापासून भंगारात पडल्यावजा आहेत. नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.तुमसर शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नेहरू शाळेजवळील जलशुद्धीकरण केंद्रात जलवाहिनी लिकेज झाली आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी तांत्रिक बिघाड दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना यश आले नाही. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. मागील चार ते पाच दिवसापासून पाण्याची नासाडी होत आहे. जुनी जलवाहिनी असल्याने लिकेज झाल्याचे समजते. दुसरीकडे उन्हाळा असल्याने नगरपरिषद प्रशासनाने शहरात पाणीपुरवठा करणे सुरु ठेवले आाहे.पाणीपुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला तर शहरात पाण्याकरिता हाहा:कार होईल.संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा विचार करून पाणीपुरवठा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.२८ मे रोजी लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे तुमसरकरांना नाराज करता येणार नाही. सर्व पदाधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाचे कर्मचारीही शासकीय कामात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी लिकेजची कामे पाणीपुरवठा केल्यानंतर करणे सुरु आहे. परंतु लिकेज पूर्णत: बंद न झाल्याने पाणी लिकेजमधून वाहून जात आहे.वृक्षांचेकठडे, घंटागाड्यांचीही अवस्था वाईटतुमसर नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात शहरात वृक्षांची लागवड केली. त्यांच्या सुरक्षेकरिता लोखंडी कठडे लावले होते. जुने कठडे काढण्यात आले. नवीन लोखंडी कठडे तयार करण्यात आले. जुन्या कठड्याऐवजी नवीन कठडे अनेक ठिकाणी लावण्यात आले नाही. सध्या जुने व नवीन कठडे जलशुद्धीकरण केंद्रात पडून आहेत. कचरा उचलणाºया काही जुन्या व नवीन घंटागाड्या सुद्धा येथे पडून आहेत. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी साचल्याने ते साहित्य निश्चितच खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील जलवाहिनी लिकेज असल्याने पाणी साचले आहे. दुरुस्तीची कामे सुरु आहेत. शहराचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्ती करता येत नाही. नागरिकांना असुविधा होईल. तांत्रिक बिघाड दूर केल्या जाईल. वृक्षांची कठडे व घंटागाड्या सुरक्षित स्थळी हलविण्यास सांगितले आहे.-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष, तुमसर.