शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर शहरात पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:41 IST

एप्रिल-मे हिटचा तडाखा बसल्याने वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका तुमसर शहराला बसला असून मागील सहा दिवसांपासून शहराचा पाणीपूरवठा ठप्प पडला आहे.

ठळक मुद्देटँकरने पाणीपुरवठा। वैनगंगा नदीपात्र कोरडे पडल्याचा फटका, सहा दिवसांपासून महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एप्रिल-मे हिटचा तडाखा बसल्याने वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका तुमसर शहराला बसला असून मागील सहा दिवसांपासून शहराचा पाणीपूरवठा ठप्प पडला आहे. नागरिकांची तहान भागविण्याकरिता नगरपरिषद प्रशासन तथा काही नगरसेवक व नगराध्यक्षातर्फे शहरात टँकरने पाणीपुरवठा करणे सुरु आहे. बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कवलेवाडा बॅरेजपर्यंत पाणी आले आहे. कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची गरज आहे.तुमसर शहरापासून वैनगंगा नदी अवघ्या पाच ते आठ किमी अंतरावर आहे. शहराची लोकसंख्या ४५ हजार इतकी आहे. कोष्टी पंपहाऊस व माडगी पंपहाऊस मधून वैनगंगा नदीपात्रातून पाण्याचा उपसा करुन तुमसरकरांना पाणीपूरवठा करण्यात येतो. सध्या वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. माडगी येथील नगरपरिषदेची पाणीपुरवठा करणारी मोठी यंत्रणा आहे. नदीपात्रात विहिरी आहेत. सदर विहिरीपर्यंत पाण्याचा प्रवाह आठ ते दहा दिवसापूर्वी बंद पडला होता.इनटेकवेलद्वारे पाणी नदीपात्रत पाण्याचा प्रवाह वळविण्यात आला. काही दिवस सुरळीत पाणी विहिरीपर्यंत आले, परंतू नदीचा प्रवाह अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील विहिरीपर्यंत पाण्याचा प्रवाह येणे बंद पडले. त्यामुळे तुमसरची पाणीपूरवठा ठप्प पडली. सहा दिवसापासून पाणीपूरवठा ठप्प आहे. कोष्टी पंपहाऊसची तीच स्थिती आहे.भांड्यांची रांगतुमसर शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता नगरपरिषद प्रशासन, काही नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुरु केले आहे. पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत असून उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी मोठी आहे. पाण्याकरिता टँकर आल्यावर नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. पाण्यासाठी भांड्यांची रांग टँकरसमोर येथे दिसत आहे.कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता कवलेवाडा येथे भेट देवून संबंधितांना सांगण्यात आले. उद्यापर्यंत शहराला पाणीपुरवठा सुरु होईल. वैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे.- प्रदीप पडोळे,नगराध्यक्ष, तुमसर

टॅग्स :water shortageपाणीटंचाई