शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीं रूपयांची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:43 IST

पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना .....

ठळक मुद्दे१० वर्षांपासून योजना बंद : मुख्यमंत्री पयेजल योजनेत झाला समावेश

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना पुनर्जिवीत करून त्याचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित होणार की भंगारात जमा होणार असा प्रश्न पडला आहे.सुमारे ८ ते १० वर्षापूर्वी तीन कोटी रूपये खर्च करुन दहा गावाकरिता ही योजना महाराष्टÑ जीवन प्राधीकरणने पूर्ण केली. सन २००३-०४ मध्ये ही योजना पूर्ण झाली. देव्हाडी, ढोरवाडा, चारगाव, हिंगणा, हसारा, खापा, परसवाडा (दे), तुडका, तामसवाडी आदी गावाकरिता ही योजना आहे. योजना पुर्णत्वास आल्यानंतर १० वर्षांपासून बंद आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर ती चालवणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता.जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे ही योजना बंद स्थितीत होती. या योजनेत लाभ घेणाºया गावांनी शिखर परिषद तयार करून पाणीपट्टी वसूली करून ही योजना चालविण्याचा अधिकार संबंधित गावांना देण्यात आला, परंतु आमदनी अठण्णी व खर्चा रूपय्या अशी या योजनेची स्थिती असल्याने येथे कुणीही तसा प्रयत्न केला नाही. सर्वच अपवाद वगळता ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले.या योजनेची पाईपलाईन गळती, नविन पाईपलाईन घालणे, लिकेज दुरुस्ती करणे, पंप दुरुस्ती करणे येथे करण्याची गरज आहे.सन २०१४-२०१५ मध्ये तशी कामे करण्यात आली. मुख्यमंत्री पेयजल योजनेत ३१ डिसेंबर २०१६ मध्ये समावेश करण्यात आला. तसे प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्हा स्तरावर पाणीपूरवठा योजनेचे स्वतंत्र कार्यालय असून अभियंते व इतर कर्मचारी आहेत.यासंदर्भात संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता ए. जी. जिभकाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झाल्यानंतर पाणी पुरवठा केव्हा केला जाईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेसंदर्भात आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे परसवाडा येथील सामाजिक कार्यकर्ता राकेश सिंगाडे यांनी निवेदन देऊन ही योजना सुरू करण्याची मागणी केलेली आहे.पाणी पुरवठा योजनेला शासनाने प्राधान्यक्रम देऊन योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांचे नाव या योजनेला दिले आहे. निदान पेयजल योजना तरी शासनाने मार्गी लावावी.- के. के. पंचबुध्दे, जि.प. सदस्य देव्हाडीमुख्यमंत्री पेयजल योजनेत देव्हाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा समावेश होऊन एक वर्ष लोटत आहे. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. आ. परिणय फुके यांनी भेटून पाठपुरावा करणार आहे.- राकेश सिंगाडे, सामाजिक कार्यकर्ता, परसवाडा (दे.)