शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तुमसर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट

By admin | Updated: April 10, 2015 00:43 IST

तालुक्यातील सिहोरा परिसरातील धरणात पाणी असतांना नियोजन शुन्यते मुळे गावात एप्रिल महिन्यात भिषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे.

तुमसर / चुल्हाड : तालुक्यातील सिहोरा परिसरातील धरणात पाणी असतांना नियोजन शुन्यते मुळे गावात एप्रिल महिन्यात भिषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. पाण्याअभावी नळ योजना अडचणीत आलेल्या आहेत. मंजुरीच्या वादात धापेवाडा तथा बावनथडी धरणाचे गेट अद्याप उघडण्यात आले नाही. तुमसर तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्या आहेत. या नद्यांच्या काठावर गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजना आहेत. एप्रिल महिण्यात नियोजन शुन्यतेमुळे नळ योजना वांझोट्या ठरत आहेत. बावनथडी नदीचे पात्र पुर्णत: आटले आहे. याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प असून नळ योजनांचे पंपगृह आहेत. पंरतु नदी पात्रात पाणीच नसल्याने नळ योजना कोरड्या पडल्या आहेत. याच नदीवर राजीव सागर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धरणात पाणी आहे. यात असलेले पाणी सोडण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडे नाही. शेतकरी तथा जनतेची तहान भागविण्यासाठी धरणात अडविण्यात आलेले पानी उपयोगात येत नाही. असे चित्र निर्माण झाले आहे. नदी काठावर वास्तव्य असणाऱ्या गावात शेतकऱ्यांचे जनावरे पाण्यासाठी भटकत आहेत. या गावात असणाऱ्या तलाव बोडी पुर्णत: आटलेल्या आहेत. विहिरीची पातळी खोलवर गेल्याने पाण्यासाठी वणवा सुरु झाला आहे. बावनथडी नदी काठाच्या दोन्ही काठावरील ६० गावे नदी पात्रात पाणी नसल्याने अडचणीत आली आहेत. यामुळे राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प आणि अदान विज प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी ४५० शेती खर्चुन धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाणी अडविण्यात आले आहे. पंरतु उर्ध्व भागाकडे पाणी नाही. या धरणाचे गट उघडण्यात आले नाही. तिरोडा उपसा सिचंन योजना तिरोडाचे नियोजन शुन्यतेमुळे ८ गावात नळ योजनांना पाणी मिळत नाही. तुमसर तालुक्याच्या दिशेने असणारा धरणाचा दरवाजा अद्याप उघडण्यात आलेला नाही. यामुळे सिहोराला पाणी पुरवठा करणारी नळ योजना अडचणीत आली आहे. १४ हजार नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याने गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गावागावात कुत्रिम पाणी टंचाईची झळ पोहचत असतांना यंत्रणा मंजुरी घेण्याचे तुणतुने हलवित आहे. पंरतु या यंत्रणेमार्फत अद्याप पुढाकार घण्ेयात आलेला नाही. सिहोरा परिसराच्या दिशेने असणारे धरणाचे गट तात्काळ उघडण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती सभापती कलाम शेख, पंचायत समिती सदस्य बंटी बानेवार, सरपंच नेहा कुंभारे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)