शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शुद्धीकरण यंत्रणा पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:00 IST

मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी मोठी येथे दोन बोरवेल्स व एक विहीर कोरडी पडली आहे. गट ग्रामपंचायत केसलवाडा कडून बोरवेल्सला फ्लोराईडयुक्त पाणी शुद्धीकरण यंत्र लावलेला आहे. परंतु बोरवेलला पाणी नसल्याने पूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा हरताळ आहे.

ठळक मुद्देलेंडेझरी येथे हाहाकार : दोन किमी अंतरावरून आणावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी मोठी येथे दोन बोरवेल्स व एक विहीर कोरडी पडली आहे. गट ग्रामपंचायत केसलवाडा कडून बोरवेल्सला फ्लोराईडयुक्त पाणी शुद्धीकरण यंत्र लावलेला आहे. परंतु बोरवेलला पाणी नसल्याने पूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा हरताळ आहे. यासंबंधी ग्रामपंचायत केसलवाडाला माहिती दिलेली असूनही आजपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. महिलांना दीड किमी अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.मोहाडी तालुक्यातील केसलवाडा ग्रामपंचायत गट अंतर्गत असलेला लेंडेझरी मोठी गाव जंगलाच्या शेजारी वसलेला गाव आहे. या गावात पंचवीस कुटुंब वास्तव्याला आहेत. लेंडेझरी गाव ४ किमी अंतरावर असलेल्या केसलवाडा गट ग्रामपंचायतला जुळलेला आहे. या गावातून एकच ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेला आहे.उर्वरित सदस्य, सरपंच, उपसरपंच हे केसलवाडा येथील असल्याने चार वर्षामध्ये एकाही पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. ५० ते ६० लोकसंख्या असलेल्या गावामध्ये एक विहीर आणि दोन बोरवेल असून बोरवेल व विहिरी आटल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा हाहाकार आहे.परिस्थीती गंभीर असूनही एक महिन्यापासून ग्रामसेवक किंवा पदाधिकाऱ्यांनी ढुंकून सुद्धा पाहिले नाही, अशी या गावाची परिस्थिती झालेली आहे.ग्रामसेवकाचे समस्येकडे दुर्लक्षगावात विविध समस्या आवासून असताना ग्रामसेवक लेंडेझरी गावात कधीही फिरकून पाहत नाही. आजपर्यंत ग्रामसेवकाने गावाला साधी भेट दिलेली नाही. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे लेंडेझरी ग्रामस्थांना विविध कामासाठी आल्यापावली परतावे लागते. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने प्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई