तुमसर : बावनथडी नदी परिसरातील गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत चिखला या गावी एक दिवसाआळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. जगविख्यात मॅग्निज खाण असलेल्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने नागरिकांमध्ये संताप असून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.बावनथडी नदीवर पाथरी या गावाजवळ गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले. जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सुमारे ३० वर्ष जुनी या योजनेतून चिखला, नाकाडोंगरी, राजापूर, गोबरवाही, सितासावंगी या गावांना पाणी पुरवठा करण्यात येते. चिखला गावी एक दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. आणि तोही केवळ १५ मिनिटांसाठी. मॉईल्सच्या सदनिकेत भरपूर पाणी सोडण्यात येत असल्याने ग्रामपंचायतने त्यांच्या कुपनलिकेला एक जडवाहिणी जोडली आहे. या कुपनलिकेला मुबलक पाणी आहे. मात्र जि.प. चे कर्मचारी या गावाला पाण्यासंदर्भात सापत्न वागणूक देत आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. प्रकरणावर तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा सरपंचा संगीता सोनवाने, उपसरपंच दिलीप सोनवाने, ग्रामपंचायत सदस्य शरीफ खान पठान, प्यारेलाल धारगावे, किशोर बानमारे आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
चिखला खाण परिसरात पाण्याची वाणवा
By admin | Updated: December 3, 2014 22:45 IST