शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

वैनगंगा नदीत वाहते दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:38 IST

पवित्र आणि जीवनदायी असलेली वैनगंगा नदीत आता अशुध्द पाणी दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. गत काही वर्षांपासून नागपूरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या प्रवाहासोबत रसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी वैनगंगेत येत आहे. परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेती आणि फळबागानाही त्याचा फटका बसत आहे. हा सर्व प्रकार माहित असतानाही नदी शुध्दीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.

ठळक मुद्देनाग नदीचा फटका : आरोग्यासह पिकांवरही परिणाम

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवित्र आणि जीवनदायी असलेली वैनगंगा नदीत आता अशुध्द पाणी दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले आहे. गत काही वर्षांपासून नागपूरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या प्रवाहासोबत रसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी वैनगंगेत येत आहे. परिणामी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेती आणि फळबागानाही त्याचा फटका बसत आहे. हा सर्व प्रकार माहित असतानाही नदी शुध्दीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.भंडारा जिल्ह्याला सुपिक करणारी वैनगंगा नदीचे विशाल पात्र आहे. बारमाही वाहणारी या नदीमुळे जिल्ह्यात समृध्दी आली. वैनगंगेच्या तिरावर धान शेती फुलली. फळबागा व इतर पिकेही मोठ्या प्रमाणात होवू लागली. जणू वैनगंगा भंडारा जिल्ह्याची जीवनदायीनी ठरली. मात्र गत काही वर्षांपासून वैनगंगेत अशुध्द पाणी येऊन मिळत आहे. गोसेखुर्द प्रकल्प झाल्यापासून त्यात आणखी भर पडली. नागपूरातून वाहणारी नाग नदी आंभोराजवळ वैनगंगेला मिळते. नागपूरातून वाहत येणाºया नागनदीत मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त व मलमुत्राचे पाणी असते. तेच पाणी वैनगंगेच्या पाण्यात मिसळून अशुध्द आणि दुर्गंधी युक्त होत आहे. राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणात पाणी साठते. धरणातील दुषीत पाणी वैनगंगा नदी पात्रात डाव्या, उजव्या कालव्याच्या माध्यमातून नागरिकांना पिण्यासाठी व शेती उपयोगासाठी सोडले जाते. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भंडारा शहरासह अनेक गावांनाही या दुषीत पाण्याचा फटका सहन करावा लागतो. दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये नागपुरातील विविध कारखान्यातील रसायने असतात. या रसायनाचा परिणाम मानवी जीवनावर होऊ शकतो. परंतु याकडे अद्यापपर्यंत कुणाचेही लक्ष नाही. नदी पात्रातील पाणी प्रयोगशाळेत पाठविल्यास हा प्रकार उघडकीस येवू शकतो. परंतु यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. शुध्द पाण्यासाठी नागरिक प्रशासनाच्या नावाने ओरड करीत आहेत. परंतु कोणत्याही उपाययोजना होत नाही. शेतातील पिकेही या पाण्यामुळे रोगग्रस्त होत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींना सांगुनही उपयोग झाला नाही.नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यापुर्वी ते शुध्द करण्यात यावे, किंवा नदीजवळ प्रकल्पाअंतर्गत नाग नदीचे प्रवाह इतरत्र वळून दुषीत होणाऱ्या वैनगंगेला वाचविता येवू शकते. यासाठी गरज आहे ते इच्छाशक्तीची.युवाशक्ती संघटनेचे अर्धदफन आंदोलनवैनगंगा नदीच्या शुध्दीकरणासाठी पवनी येथील युवाशक्ती संघटनेच्या वतीने अर्धदफन आंदोलन महिन्याभरापुर्वी करण्यात आले होते. तरुणांनी वैनगंगेच्या नदीपात्रात स्वत:ला अर्धेअधिक गाडून घेतले होते. या आंदोलनानंतर वैनगंगा शुध्दीकरणाचा प्रश्न एरणीवर येईल असे वाटत होते. परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. आजही दररोज लाखो लिटर अशुध्द पाणी नागनदीच्या माध्यमातून गोसे प्रकल्पात साचले जात आहे.विविध आजाराला आमंत्रणरसायनयुक्त आणि मलमुत्राचे पाणी नकळत नागरिकांपर्यंत पोहचत असल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. खाजेसह विषाणुजन्य आजार आणि डायरिया नदीतिरावरील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पवनी परिसरातील अशा रुग्णांची संख्या मोठी असते. आजारावर उपचार करताना नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे. गावागावांत वैनगंगेच्या दुषित पाण्यामुळे रुग्ण दिसत आहे. आरोग्याच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आहे.